सत्यार्थ न्युज प्रतिनिधी – किरण माळी (जळगाव, महाराष्ट्र)
जळगाव ग्रामीणचे शिवसेनेचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या प्रचारानिमित्त दिनांक 12 नोव्हेंबर रोजी धरणगाव शहरात आले असता त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले महाराष्ट्र मध्ये महायुती 2 वर्षाच्या कार्यकाळात जनतेचे अनेक विकास काम केले. असून लाडक्या बहिणीसाठी दर महिन्याला 1500 रुपये आम्ही पुन्हा निवडून आल्यास दरमहा 2100 रुपये करू लाडक्या बहिणींना पैसे मिळायला नको म्हणून विरोधक कोर्टात गेले परंतु काहीही झाले नाही महाराष्ट्रात शेतकरी असतील युवक असतील महिला असतील या सर्वांसाठी कामे केली पुन्हा आता सरकार आलं जास्तीचे विकास कामे करू गुलाबराव पाटील हे महाराष्ट्राचे मुलुख मैदान तोफ आहे. मागच्या पंचवार्षिक ला त्यांच्या विरुद्ध जे उमेदवार उभे होते ते अनेक उमेदवार गुलाबराव पाटील सोबत आहेत त्यामुळे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चिंता करण्याची काहीही गरज नाही आज एवढा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे जणू काही ही विजयी सभा आहे आता फक्त गुलाबराव तुम्हाला लीड वाढवायचे आहे सर्व बंधू-भगिनींनी लाडक्या बहिणींनी गुलाबराव पाटलांच्या अनुक्रम नंबर 2 धनुष्यबाण चिन्हावर बटन दाबून लाखाच्या मताधिकाने विजय करावे असे आवाहनही केले.
या प्रसंगी गुलाबराव पाटील साहेब,भाजप जिल्हा अध्यक्ष जळकेकर महाराज,शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश पाटील,भाजपाचे ज्येष्ठ नेते डी जी पाटील साहेब,सुभाष अण्णा पाटील,शिवसेना महिला जिल्हा प्रमुख सरिताताई महाजन,शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील सर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन,गजानना पाटील,संजय पाटील सर,देविदास पाटील या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर आ.किशोर आप्पा पाटील,आ.चंद्रकांत सोनवणे,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार,भारतीय जनता पक्षाचे पी सी आबा पाटील,कल्पनाताई अहिरे, चंद्रशेखर उत्तरदे,माधुरीताई अत्तरदे,गोपाल बापू चौधरी,कमलाकर पाटील,नाटेश्वर पवार,जिजाभाऊ पाटील,पुष्पाताई पाटील,प्रमिलाताई रोकडे,भारतीताई चौधरी,संजय चौधरी,भैया भाऊ महाजन,विलास महाजन,दिलीप महाजन,कन्हैया रायपूरकर,चंदन पाटील,रवी महाजन,अँड वसंतराव भोलाणे,रवींद्र कंखरे,मच्छिंद्र पाटील,अमोल पाटील,शिरीष आप्पा,भैय्या महाजन,बाळासाहेब जाधव,आर पीआयचे अरविंद मानकर,प्रा.मिलिंद पवार,नवल खंडारे व शिवसेना भाजप महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन नगरसेवक अभिजीत पाटील यांनी केले. आभार पी एम पाटील सर यांनी मानले.