वैजापुरात राजकीय भूकंप डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी शिवसेनेत.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुक्यातील एका राजकीय क्षेत्रातील विधानसभेचे दावेदार म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आज मुंबई या ठिकाणी मातोश्री येथे जाऊन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला डॉक्टर दिनेश परदेशी यांनी दोन वेळेस विधानसभा निवडणूक लढवलेली आहे तर वैजापूर नगर परिषदेचे ते वीस वर्ष नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होते. गोर गरिबांची सेवा करत त्यांनी आपली जनतेची सेवा त्यांनी केली कोणाचे ऑपरेशन असेल कोणाचे लग्न असेल दवाखान्याचे काम असेल ताबडतोब ते फोन करून काम करतात त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर खूप विश्वास बसलेला आहे ते भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस होते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे संचालक
.आता विधानसभा निवडणूक जवळ आली असून त्यांना शिवसेनेकडून विधानसभेचे उमेदवार म्हणून ओळखलं जातं वाणी साहेबांनंतर शहराला दिनेश भाऊंनीच साथ दिली असं बोललं जातं आता वैजापूर विधानसभेच्या उमेदवार दिनेश भाऊ असणार आहे असे देखील चर्चा चालू आहे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री अब्दुल सत्तार माजी मंत्री बाळासाहेब थोरात असे अनेक मंत्री की त्यांची मैत्री ही जीवाभावाची आहे एकाच फोन मध्ये भाऊंच्या ते काम करतात. डॉ. दिनेश परदेशी ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.