भरधाव वाळू वाहतूक करणारा हैवा ट्रक ने चिमुकल्यास चिरडविले…संतप्त नागरिकांनी पेटविला ट्रक…
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
साईनाथ रामनाथ निंबाळकर इयत्ता पाचवी वय वर्ष 11 न्यू हायस्कूल लाडगाव येथील विद्यार्थी आपली चार वाजता शाळा सुटल्यानंतर घरी परतत असताना लाडगाव बस स्टॅन्ड समोर वाळू वाहतूक करणारा ट्रक ने मुलास चिरडविले व त्याचा जागीच मृत्यू झाला. व ड्रायव्हर तिथून पळून गेला .आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटविले. लाडगाव परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.