वैजापूर येथे नागरिकांनी घेतला विविध शासकीय योजनांचा लाभ.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
द्रौपदी लॉन्स येथे आज “महिला सशक्तीकरण अभियान” अंतर्गत वैजापूर मतदारसंघातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार व बाल संगोपन योजनेच्या नवीन मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना माझ्या हस्ते मंजुरी पत्र वाटप केले.
.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तालुक्यात समिती स्थापन केली असून त्या समितीचे अध्यक्ष आमदार रमेश बोरनारे सर आता पर्यंत “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे” एकुण 68 हजार महिलांनी अर्ज ऑनलाईन केले असून सर्व महिला पात्र ठरल्या आहेत आज प्राथमिक स्वरुपात 11 लाडक्या बहिणींना मंजुरी पत्र देण्यात आले.
.
तसेच श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेचे 7 हजार 662 लाभार्थ्यांना देखील मंजुरी पत्र देण्यात आले. वेळोवेळी पाठपुरावा करून त्यांच्या माध्यमातून आता पर्यंत 5 वर्षाच्या कार्यकाळात 10 ते 12 हजार पात्र लाभार्थ्यांचे मंजुरी करून त्यांना आता या योजनेचा लाभ मिळत आहे.
श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत निराधार, अंध, अपंग, विधवा, परित्यक्त्या अशा सर्व दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी असुन त्यांना आर्थिक सहाय्य करण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजना आहे.
.
ज्या मुलांचे आई किंवा वडील नाहीये त्या अनाथ मुलांचा संगोपनासाठी सरकारने ही बालसंगोपन योजना चालू करण्यात आली असून तालुक्यातील 189 मुलांना या योजनेचा फायदा होत आहे. तसेच उर्वरित वंचित असलेल्या लाभार्थींना सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी देखील प्रयत्न कारणार असल्याचे आश्वासन दिले.
.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जऱ्हाड साहेब, मा नगराध्यक्ष साबेरभाई, तहसीलदार सुनील सावंत साहेब, न.पा. मुख्याधिकारी भागवत बिघोत, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब पा जगताप, सभापती रामहरी बापू जाधव, मा.जि.प.सदस्य दिपक भाऊ राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पा साळुंके, शहरप्रमुख पारस घाटे, युवासेना जिल्हा भरत पा कदम, जिल्हा समन्वयक आमीर अली, तालुकाप्रमुख श्रीराम गायकवाड, शहर प्रमुख श्रीकांत साळुंके, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख छायाताई बोरणारे, तालुकाप्रमुख पद्माताई साळुंके, शहर प्रमुख सौ.सुप्रियाताई व्यवहारे, सौ गोरक्षा ताई व जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थीत होते.