सत्यार्थ न्यूज रिपोर्टर – किरण माळी
प्रतिनिधी/ पाळधी येथील फुले नगर जिल्हा परिषद शाळेत विशेष उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला या शाळेने कला राष्ट्रप्रेम शिक्षणाचा एक अद्भुत मिलाप प्रस्तुत करून राष्ट्र प्रेमाचा आदर्श निर्माण केला.
या कार्यक्रमाची सुरुवात सीमा सुरक्षा दलामध्ये सेवार्थ असलेल्या, श्री प्रदीप ब्रिजलाल धनगर (BSF) जवान यांच्या हातून ध्वजारोहणाने झाली, ज्यामध्ये शाळेचे प्रमुख अतिथी शिक्षक, माजी विद्यार्थी व पालकांनी आपली उपस्थिती नोंदवली. या विशेष दिवशी, विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. लेझीम पथक, नृत्य, गाणे, लघुपटाच्या माध्यमातून सर्व उपस्थित मान्यवरांच्या हृदयामध्ये स्वातंत्र्याच्या वीररस निर्माण केला. सीमेवर असलेल्या सैनिकाच्या जीवनावर लघुपट दाखवत जवानाने आपल्या सर्वस्वाच्या केलेल्या त्यागाची जाणीव करून दिली.
संपूर्ण परिसर हा राष्ट्र प्रेमाने न्हाऊन निघाला.
कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापिका सौ चित्रा पाटील, माजी सभापती मुकुंद ननवरे, उत्सव समितीच्या अध्यक्ष आदी उपस्थित होते..