सत्यार्थ न्यूज रिपोटर : प्रभाकर सरोदे
पाचोरा :- डॉक्टरांचे कार्य मानवतावादी ! : वैशालीताई सुर्यवंशी डॉक्टर दिनानिमित्त ‘देवदूत सन्मान सोहळा’ उत्साहात

पाचोरा : दिनांक १ जुलै
डॉक्टर हे मानवाला निरामय आयुष्यासाठी प्रयत्नशील असून त्यांचे कार्य मानवतावादी असल्याचे गौरवादगार शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी काढले. आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधून त्यांच्या वतीने शहरासह परिसरातील वैद्यकीय व्यावसायिकांच्या सत्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.आज डॉक्टर दिनाचे औचित्य साधून वैशालीताई सुर्यवंशी यांच्या वतीने देवदूत सन्मान सोहळा या उपक्रमाच्या अंतर्गत डॉक्टर्सचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अतुल पाटील, डॉ. अनिल झंवर, डॉ. भरत पाटील, डॉ. अजय परदेशी, दिनेश सोनार, डॉ. शरद वाणी, डॉ. विकास केजरीवाल, डॉ. विशाल पाटील, डॉ. स्वप्निल पाटील, डॉ. सुनील हटकर, डॉ. नेहा परदेशी, डॉ. शरद वाणी, डॉ. संजय जाधव, डॉ. सागर गरुड, डॉ. सदानंद वाणी, डॉ. रुपेश पाटील, डॉ. रितेश देठे, डॉ. राहुल पटवारी, डॉ. राहुल पाटील, डॉ. राहुल काटकर, डॉ. आर.डीपाटील, डॉ. अमर पंजाबी, डॉ. अजय परदेशी, डॉ. अमोल जाधव, डॉ. अनुपमा भावसार, डॉ. अनुजा देशमुख, डॉ. खाटीक, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. बन्सीलाल जैन, डॉ. बापूराव पाटील, डॉ. दीपक भावसार, डॉ. दीपक चौधरी, डॉ. हर्षल देव, डॉ. जीवन पाटील, डॉ. कुणाल पाटील, डॉ. मुकेश तेली, डॉ. नंदकिशोर पिंगळे, डॉ. नरेश गवांदे, डॉ. प्रशांत सांगळे, डॉ. विजय जाधव, डॉ. अतुल पाटील, डॉ. अर्चना पटवारी, डॉ. भारत कुमार प्रजापत, डॉ. ग्रीष्मा एस पाटील, डॉ. जयश्री डी. सोनार , डॉ. प्रतिभा तेली, डॉ. प्रिया देठे, डॉ. राहुल पटवारी, डॉ. शितल सावनेरकर, डॉ. प्रतिभा तेली , डॉ. ज्योती साळुंखे, डॉ. अमृता झंवर, डॉ. अंकुर झंवर, डॉ. रणवीर पाटील आणि डॉ. श्रद्धा पाटील यांना गौरविण्यात आले. या प्रसंगी प्रत्येक डॉक्टरला शाल, पुष्पगुच्छ आणि पालेभाज्यांच्या बियाण्यांचे किट देऊन सन्मानीत करण्यात आले. वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून अहोरात्र रूग्णसेवा करणार्या वैद्यकीय व्यावसायिकांचे कौतुक केले. याप्रसंगी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई सुर्यवंशी, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, उपजिल्हा प्रमुख उध्दव मराठे, बालू अण्णा, दिपकसिंग राजपूत, रमेश बाफना, अरूण पाटील, गणेश परदेशी, भरत खंडेलवाल, संतोष पाटील, संदिप जैन, योजनाताई पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती होती .
अशाच पोस्ट साठी सत्यर्थ न्यूज ला सबसक्रायिब करा
बातमी आणी जाहिरात देण्यासाठी संपर्क
ब्युरो चीफ पाचोरा : चेतन सरोदे
मो.9960922398
















Leave a Reply