भडगाव : संजय गांधी अनुदान त्वरित मिळावे – योजना ताई पाटील.

संजय गांधी निराधार योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान गेल्या ३ महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळालेले नाही. निराधार व दुर्बल घटकांसाठी या योजनेअंतर्गत श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना, वृद्धापकाळ योजना, विधवा निवृत्ती योजना, दिव्यांग योजना इत्यादी लाभार्थ्यांना डीबीटी योजनाद्वारे थेट खात्यात मासिक अनुदान जमा केले जाते. त्यासाठी म. तहसिलदार, म. तलाटी व संबधित शाखेने लाभार्थ्यांना आधार कार्ड व बँक पासबुक बाबत सहकार्य करावे आणि अनुदान त्वरित मिळावे अशा आशयाचे निवेदन संजय गांधी निराधार योजना मा. अध्यक्षा योजना पाटील यांनी निवासी नायब तहसिलदार सुधीर सोनवणे यांना निराधारां समवेत दिले आहे
अशाच पोस्ट साठी सत्यर्थ न्यूज ला सबसक्रायिब करा
बातमी आणी जाहिरात देण्यासाठी संपर्क चेतन सरोदे मो.9960922398

















Leave a Reply