Advertisement

भडगाव ब्रेकिंग :- दुःखद पावसातच विझला चिराग 

भडगाव ब्रेकिंग :- दुःखद पावसातच विझला चिराग 

भडगाव :- दिनांक 17 जून सोमवार रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पाचोरा भडगाव हायवेवरील बांबूरुड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात सुमारे पंधरा वर्षीय बालक जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. भडगाव तालुक्यातील आमडदे येथील डॉक्टर नरेंद्र भोसले हे कुटुंबीय सोबत पाचोर्‍याहून भडगावच्या दिशेने येत असताना सुरू असलेल्या पावसात रात्री 9 वाजेच्या सुमारास अपघात घडला आणि त्यात त्यांचा मुलगा राजवीर हा बालक रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या पोटावरून ट्रकचे चाक गेल्याने ही दुर्दैवी घटना घडली. तर दुचाकी वरील तिघेही जखमी झाले होते त्यांना पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मयत राजवीर या बालकावर आज दिनांक 18 जून रोजी नऊच्या सुमारास अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. या घटनेने भडगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!