विज पडून एकाचा मृत्यू तर तिघे जखमी
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
वैजापूर तालुक्यात शिवराई शिवरात एक ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली भागवत काशिनाथ डिके वय 32 वर्षे असे या मृत तरुणाचे नाव आहे तर सचिन आसाराम सोनवणे वनिता सोनवणे नीता सोनवणे या तिघी जखमी आहेत या घटनेबाबत अधिक माहितीनुसार शिवराई-शिवरातील गट क्रमांक 22 मध्ये ही सर्व शेतकरी पेरणी करत असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेचा गड गटासह पाऊस झाला त्यामुळे हे सर्व एका ठिकाणी फटा घेऊन आडोशाला बसले होते परंतु अचानक पणे खूप मोठा आवाज होऊन वीज चमकली व ती त्यांच्यावरच पडण्याची घटना या ठिकाणी घडली त्यामुळे या ठिकाणी नागरिकांनी येऊन त्यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले त्यावेळी भागवत काशिनाथ डीके यांना तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले व अन्य तिघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहे


















Leave a Reply