पाचोरा : विवाहितेस पैशांसाठी केली गांजपाठ..

पाचोरा : लोहटार येथील माहेर तर देवपूर, धुळे येथील सासर असलेल्या विहितेचा मानसिक व शारीरिक छेड करून गांजपाठ केल्याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल. 11 फेब्रुवारी 2016 पासुन ते आज पावेतो सासरी देवपुर धुळे व माहेरी लोहटार ता पाचोरा येथे पती कृष्णा जाधव सासु, जेठ, नंणद, यांनी लोहटार येथील माहेर असलेल्या तर देवपूर. धुळे येथील सासर असलेल्या रमाबाई यांना वेळोवेळी तुझ्या माहेरच्या लोकांनी चांगले लग्न लावुन दिले नाही हुंड्यात पैसे देखील दिले नाहीत असे बोलून पैश्यांची मागणी करुन चापटा बुक्यांनी मारहान करुन शाररीक व मानसिक त्रास देऊन गांजपाठ केली म्हणून रमाबाई यांचे फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशन येथे सासरच्या चारही मंडळीविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली असून या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रकाश पाटील हे करीत आहेत.

















Leave a Reply