Advertisement

पाचोरा तालुका : खळबळजनक, गोंट्यात टाकून संपविले?…

पाचोरा तालुका : खळबळजनक, गोंट्यात टाकून संपविले?…

सत्यार्थ न्यूस रिपोटर चेतन सरोदे / प्रभाकर सरोदे

पिंपळगाव हरेश्वर येथील वयोवृद्ध म्हातारीस गोंट्याच्या पोत्यात टाकून अज्ञाताने संपवल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 15 मे बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील बाजारपेठेत जवळील मज्जिद शेजारी सुमारे 80 वर्षीय वयोवृद्ध म्हातारी नामे मंजाबाई भोई या एकट्याच राहत होत्या, आज दिनांक 15 मे बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता कुठलाही आवाज घरातून न आल्याने शेजारच्यांनी घरात डोकावून पहिले असता वयोवृद्ध महिला गोंट्याच्या पोत्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळून आली. घटनेची माहिती पोलिसांना देताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तात्काळ घटनेस्थळी धाव घेतली, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून म्हातारीस असे कुणी कोंबून मारले? का इतर काही याचा शोध घेणे सुरु झाले असून मृतदेह पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन करीत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!