Advertisement

मिरजेतील टाकळी इथे ओढ्याच्या पाण्यात ओतले दूध; ‘अन्न आणि औषध प्रशासन’ चा घेतला भेसळखोरांनी धसका

प्रतिनिधी सुधीर गोखले

मिरजेतील पूर्व भागात सलगरे येथे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळयुक्त दूध निर्मितीवर केलेल्या कारवाईने तालुक्यातील भेसळखोरांनी चांगलाच धसका घेतला आहे. या कारवाईनंतर टाकळी येथे काही भेसळखोरांनी चक्क शेकडो लिटर दूध ओढ्यात ओतून टाकले. पाण्याच्या प्रवाहाचा रंग पंधरा झाल्याने ग्रामस्थांनी इतरत्र चौकशी केली असता हा प्रकार उजेडात आला आणि सर्वत्र खळबळ उडाली. मिरज आणि पुरव भागात अशा अनेक डेअऱ्या आणि चिलिंग प्लांट आहेत. येथून हजरो लिटर दूध संकलन होते ते विविध शहरामध्ये पाठवले जाते सलगरे येथे दुधात फॅट वाढवण्यासाठी दुधात भेसळ केली जात असल्याचे प्रशासनाच्या तपासणीमध्ये निष्पन्न झाले या प्रकरणी संबंधित दूध संकलन केंद्राच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या यानंतर पूर्व भागातील छोट्या मोठ्या दूध संकलन आणि चिलिंग प्लांट वर प्रशासनाची करडी नजर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिरज शहरांमध्येही असे छोटे मोठे संकलन केंद्रे आहेत आणि चिलिंग प्लांट कार्यरत आहेत तिथे तपासणीची गरज आहे. टाकली येथील ओढ्याचे पाणी पांढरे दिसल्यावर भेसळयुक्त दूध नष्ट करण्याच्या उद्देशाने हे दूध ओढापात्रात ओतल्याच संशय व्यक्त होत आहे.          

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!