Advertisement

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४३ व्या जयंती निमित्ती मिरज मध्ये अभिवादन

प्रतिनिधी सुधीर गोखले
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४३ वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे त्यानिमित्त मिरजेतील श्री दत्त मंदिर चौक परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास नगरसेवक मोहन वाटवे, नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेटे, उद्योजक विवेक शेटे यांच्यासह भाजप चे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेविका सौ अपर्णा शेटे म्हणाल्या आपल्या देशाप्रती असलेले प्रेम आणि निष्ठा काय असते हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्रातून नव्या पिढीने शिकावी. यावेळी भाजप नेते बाबासाहेब आळतेकर, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे राजेंद्र नातू, डॉ भालचंद्र साठे, प्रसन्न चिपलकट्टी मिलिंद भिडे, आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!