Advertisement

लवकरच वाहनधारकांना पेट्रोल चे पर्याय होणार उपलब्ध … सुपर मार्केट च्या धर्तीवर पेट्रोल पंपावर मिळणार E २० E ३० पर्यंतचे इथेनॉल पेट्रोल

प्रतिनिधी सुधीर गोखले

वाहनधारकांना सध्या पेट्रोल पंपावर पंप उपलब्ध असलेले पेट्रोल विकत घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र लवकरच आता वाहनधारकांना इथेनॉल चे मिश्रण असलेले मात्र वेगवेगळ्या इंजिन क्षमता असलेले पट्रोल चे पर्याय पेट्रोल पंपावर उपलब्ध असतील म्हणजेच सुपर मार्केट च्या धर्तीवर E२० E२२ E२५ आणि E ३० असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या केंद्र सरकार ने या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याचे अधिकृत वृत्त आहे. तशा पायाभूत सुविधा पंपांवर उपलब्ध करून देण्याच्या सूचना ऑइल मार्केटिंग कंपन्यांना केल्या आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम, आणि हिंदुस्थान पेट्रोलियम आदी सरकारी कंपन्यांना त्याच प्रमाणे जिओ -बीपी मोबिलिटी नायरा एनर्जी शेल या खाजगी क्षेत्रातील अशा प्रकारचे इंधन पुरवण्यासंदर्भात तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत नुकतेच भारतीय मानक ब्युरो ने इथेनॉल ब्लेंडींग चे नवीन निकष जरी केले आहेत त्यानुसार सरकारने हे पाऊल उचलल्याचे समजते मात्र जर अशा पद्धतीने इंधन विक्री ची व्यवस्था होणार असेल तर पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणावर बदल करावे लागणार आहेत आणि वेगवेगळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्धी साठी मोठी नवीन यंत्रणा उभी करावी लागेल त्यासाठी मोठी आर्थिक तयारी करावी लागेल आणि मनुष्यबळ तितकेच लागेल. ब्लेंडींग कंट्रोल सिस्टीम आणि इंधनाच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी फ्युएल क्वालिटी मॉनिटरिंग अशा सवय सिस्टीम उभ्या कराव्या लागतील. त्याच प्रमाणे प्रत्येक पंपावर कोणत्या प्रकारचे इथेनॉल मिश्रित पेट्रोल विक्रीस उपलब्ध आहे त्याची माहिती देणे बंधनकारक असेल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या इंधन प्रकारामध्ये वेगवेगळ्या इंधनाचे दर असू शकतात.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!