Advertisement

मिरज पूर्व भाग तसेच ग्रामीण भागातील महावितरणच्या अघोषित लोडशेडिंग ला शिंदे सेनेचा विरोध; महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन

प्रतिनिधी सुधीर गोखले

सध्या उष्म्याने हैराण जनतेला महावितरणच्या अघोषित लोडशेडिंग ला सामोरे जावे लागत आहे तर ग्रामीण भागातील शेतीची कामे करणे मुश्किल होत असून या संदर्भात शिवसेनेच्या (शिंदे गट) महानगर प्रमुख प्रा मोहन वनखंडे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तर मिरज पूर्व भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी महावितरण चे कार्यालय गाठले यावेळी कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी प्रा मोहन वनखंडे यांचे स्वागत करून निवेदन स्वीकारले. यावेळी शिवसेना नेते प्रा. मोहन वनखंडे म्हणाले ग्रामीण भागात सध्या अनियमित आई कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. महावितरण ने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा वीज पुरवठा तात्काळ सुरळीत करावा. दिवसभर वीज पुरवठा सुरळीत ठेवावा जेणेकरून शेतातील पाणी उपसा करणाऱ्या मोटारी सुरु राहतील भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान होणार नाही. यावेळी विलास देसाई, चंद्रकांत मैगुरे, विजय पाटील तुषार खांडेकर. अजित शेजूळ संजय लिम्बीकाई आणि इतर शेतकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!