प्रतिनिधी सुधीर गोखले
आता १ जुलै हि तारीख एच.एस.आर.पी.सी नंबर प्लेट बसवण्यासाठी अंतिम केली गेली असून पाच वेळा मुदतवाढ देऊनही जय वाहनधारकांनी अद्याप या नंबर प्लेट बसवल्या नाहीत त्यांनी आर टी ओ कार्यालयातील इतर कामे रोखले जाणार असल्याचा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. १ धुलाई पासून आर टी ओ कार्यालय आणि पोलीस प्रशासनातर्फे विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे जर वाहनांना हि नंबर प्लेट नसेल तर तात्काळ एक हजार रुपये दंड होऊ शकतो. राज्यामध्ये १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक अर्थात HSRP नंबर प्लेट आपल्या वाहनांना बसवणे अनिवार्य आहे. शासनाने हि नंबर प्लेट बसवण्यासाठी तब्बल पाच वेळा मुदत वाढ दिली असून आता ३० जून हि अंतिम तारीख मानण्यात येत आहे. यानंतर दंडात्मक कारवाईला वाहनधारकांना सामोरे जावे लागणार असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यामध्ये १ एप्रिल २०१९ पूर्वीची ५५९२९७ वाहने आहेत यापैकी ३लाख २० हजार ५०६ वाहनांनी या नंबर प्लेट बसवल्या आहेत. मात्र अद्याप २,३८,७७१ वाहनांना या नंबर प्लेट बसवणे बाकी आहे. आता ३० जून नंतर वाहनांच्या हस्तांतरणासह RTO कार्यालयाशी संबंधित इतर महत्वाची कामे रोखली जाणार आहेत आता कोणत्याही परिस्थिती मध्ये १ जुलै पासून प्रादेशिक परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासन वाहन तपासणी साठी रस्त्यावर उतरणार आहे ज्या वाहनधारकांनी अद्याप या नंबर प्लेट बसवल्या नसतील त्यांनी अजूनही या नंबर प्लेट बसवून घ्याव्यात असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी केले आहे.
Leave a Reply