प्रतिनिधी सुधीर गोखले
दत्तसंप्रदायाचे पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे श्रद्धास्थान आणि साक्षात श्री दत्तात्रेयांची राजधानी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातकृष्णा पंचगंगा नदीतीरावर बसलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी या गावामध्ये दररोज शेकडो भाविकांची वर्दळ असते मात्र येथील परिवहन विभागाचे बसस्थानक मात्र असंख्य असुविधांच्या विळख्यात सापडले आहे. या दत्तनगरी मधील बसस्थानकामधे प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत दररोज शेकडो प्रवासी या बसस्थानकामध्ये येजा करत असतात मात्र सध्या शुद्ध पिण्याच्यापाण्याची सोय तेही अपुरी असल्याचे चित्र आहे. तर परिसर अस्वच्छ आहे, ऐन उन्हाळ्यामध्ये प्रवाशांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत आहे काही ठिकाणी बंद पडलेले पंखे अपुरी प्रकाशयोजना, स्वच्छता गृहे असुरक्षित आणि अस्वच्छ आहेत सुरक्ष यंत्रणा तीही अपुरी आहे. कंपाउंड भिंत पडलेल्या अवस्थेत आहे. सध्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये प्रवाशांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध नाही परिसरात पसरलेल्या दुर्गंधी मुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवाशांना रात्री अपरात्री प्रवास करत असताना अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे इथे प्रवाशाना एखाद्या बस ची वाट पाहणेही मुश्किल आहे. स्थायिक नागरिकांनी आणि प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही परिवहन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. तसेच बस फेऱ्यांमध्येही वाढ करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
Leave a Reply