Advertisement

सायबर गुन्हांची साखळी उध्वस्थ करणार; लोकाभिमुख पोलिसिंग वर भर देऊ; नूतन आय.जी रंजनकुमार शर्मा

प्रतिनिधी सुधीर गोखले

अलीकडील काळामध्ये वाढलेली ऑनलाईन फसवणूक हि चिंतेची बाब आहे. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले असले तरी हि साखळी उध्वस्थ करण्यावर आपला भर असेल यामागील मुख्य सूत्रधार शोधण्यासाठी निश्चित पाठपुरावा करू. अंमली पदार्थांची तस्करी संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी आपला अग्रक्रम असेल. त्याच प्रमाणे काळे धंदे करणारे तसेचसमाजात अस्थिरता निर्माण करणारे समाजकंटक यांच्यावर कायद्याचा वचक कशा प्रकारे राहील याकडे माझे लक्ष असेल असे प्रतिपादन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी कोल्हापूर येथे पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या मनोगतामध्ये केले. मावळते आय जी सुनील फुलारी यांनी आपला पदभार रंजनकुमार यांना हस्तांतरित केला यावेळी कोल्हापूर जिल्हयाचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल उपस्थित होते. ते म्हणाले कि सायबर गुन्ह्यासह संघटित टोळ्यांच्या म्होरक्यांना टार्गेट करूनच अधिकाऱ्यांनी योग्य पावले उचलावीत तसेच लोकाभिमुख पोलिसिंग वर माझा भर असेल. सायबर गुन्हेगारांची साखळी मोडीत काढत असताना नागरिकांनीही दक्षता बाळगली पाहिजे. कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये नशामुक्त प्रभाग हि संकल्पना राबवण्याची माझी कल्पना आहे. समाजात अस्थिरता पसरवणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईचा बडगा उगारण्या बरोबरच त्यांच्यावरील प्रतिबंधित कारवाईला माझे प्राधान्य राहील परिक्षेत्रातील कोणत्याही पोलीस ठाण्यात येणाऱ्या अभ्यागतांची योग्य चौकशी करून त्यांना न्याय देण्यासाठी पोलिसांची भूमिका राहील. यावेळी मावळते आय जी सुनील फुलारी म्हणाले कि माझ्या कार्यकाळामध्ये परिक्षेत्रातील सर्वच पोलीस ठाण्यांनी मला चांगले सहकार्य केले संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले. अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी चांगले काम आमच्या हातून झाले असे मला वाटते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!