तहसीलदार गिड्डे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला शासकीय सेवेमध्ये नोकरी; महसूलमंत्र्यांनी शब्द पाळला; माजी मंत्री आमदार डॉ सुरेश खाडे यांच्या पाठपुराव्याला आले यश
प्रतिनिधी सुधीर गोखले
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तहसीलदार राकेश गिड्डे यांच्या चार चाकी वाहनाला काही दिवसापूर्वी भीषण अपघात होऊन त्या अपघातामध्ये गिड्डे यांचे निधन झाले होते या घटनेने पूर्ण महाराष्ट्र तर हळहळला होताच पण विशेष करून महसूल विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांना हा मोठ्ठा धक्का होता. मात्र मिरज विधानसभेचे आमदार आणि माजी मंत्री डॉ सुरेश खाडे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सतत पाठपुरावा करून त्यांच्या पत्नी नेहा राकेश गिड्डे यांना ‘गट क’ मधील नोकरीची अनुकंपा धर्तीवर संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या गिड्डे परिवाराच्या परिस्थितीचा सहानुभूती पूर्वक विचार करून शासनाने त्यांना बीड ऐवजी त्यांच्या सोईनुसार सांगली जिल्ह्यात शासकीय सेवेत सेवेसाठी परवानगी देऊ केली आहे या निर्णयाचे मिरज तालुक्यामधून स्वागत होत आहे. ९ एप्रिल रोजी अंबाजोगाई लातूर महामार्गावर एक भीषण अपघात झाला या अपघातामध्ये केज तालुक्याचे तहसीलदार आणि मिरज तालुक्यातील एरंडोली गावचे सुपुत्र राकेश गिड्डे हे अपघाती निधन पावले होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः गिड्डे परिवाराची भेट घेऊन सांत्वन देखील केले होते तसेच यावेळी मंत्री मोहोदयांनी श्रीमती गिड्डे यांना अनुकंपा तत्वावर नोकरीचे आश्वासन देखील दिले होते तो दिलेला शब्द मंत्री महोदयांनी पाळल्याबद्दल आज एरंडोली ग्रामस्थ तसेच मिरज तालुक्यातून समाधान व्यक्त होत आहे. श्रीमती नेहा गिड्डे यांनी २५ एप्रिल रोजी शासनाकडे रीतसर अर्ज केला होता त्या नंतर बीड चे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांचे कडून शासनाकडे सकारात्मक अहवाल गेल्यावर महसूल विभागाचे उपसचिव महेश वरुडकर यांनी तात्काळ पुणे विभागीय आयुक्तांना पत्र लिहून श्रीमती गिड्डे यांना सांगली जिल्ह्यात शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत आदेश दिले आहेत.
Leave a Reply