प्रतिनिधी सुधीर गोखले
महापालिकेच्या मिरजेतील प्रभाग ५ मधील मंडले पेट्रोल पंप ते माळी स्मशानभूमी रस्त्याच्या कामासाठी चक्क तीन वेळा निधी देण्यात आला असल्याची तक्रार जनसुराज्य पक्षाने एका निवेदनाद्वारे आयुक्तांकडे केली आहे. तक्रारीत म्हणले आहे, प्रभाग पाच मधील म्हैसाळ ओढा ते माळी स्मशानभूमी तसेच रुईकर पाणंद ओढ्यापासून वखारभाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंप पर्यंत चा रस्ता हॉटमिक्स करणे या कामी २७ एप्रिल २०२३ रोजी १ कोटी २० लाख ९३५ रुपयांचा निधी मंजूर होऊन या कामाची वर्क ऑर्डर एस एफ चौगुले या देण्यात आली होती सदर या रस्त्याचे काम २०२५ मध्ये सुरु झाले मात्र वखार भाग झोपडपट्टी ते मंडले पंप हा रस्त्याचा भाग अद्यापही अपूर्ण आहे. याच रस्त्याच्या भागासाठी खासदार विशाल पाटील यांनी मुरुमीकरण करण्यासाठी ९ लाख ९४६ रु २०२५-२०२६ मध्ये मंजूर केले वर्क ऑर्डर निघाली. आता परत स्थायी समितीने माळी स्मशानभूमी, वखार भाग ते मंडले पंप हा रस्ता हॉटमिक्स करण्यासाठी सुमारे १ कोटी २५ लाख ६१३ इतका निधी मंजूर केला आहे म्हणजे या एकाच रस्त्यासाठी तीन वेळा निधी मंजूर होऊन देखील अद्याप या रस्त्यामधील काही भाग एस एफ चौगुले या ठेकेदाराने अर्धवट ठेवले आहे. मात्र महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्या प्रकरणी गांधारीचे भूमिका घेतली आहे जनतेच्या पैशातून नक्की कोणाचे खिसे भरले जात आहेत कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी एकाच रस्त्यासाठी कशासाठी होत आहे असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे. याबाबत जनसुराज्य पक्षाने उठवलेल्या या आवाजाचे नागरिकांमधून स्वागत होत आहे.
Leave a Reply