Advertisement

मिरजेतील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाचा दहावी परीक्षेत १०० टक्के निकाल : यशाची परंपरा कायम

प्रतिनिधी सुधीर गोखले

गुरुकुल शिक्षण संस्था संचलित ज्ञान प्रबोधिनी विद्यालय ने यंदाच्या दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते विद्यालयात दहावी परीक्षेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आणि 80 टक्के पेक्षा गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते. दहावी परीक्षेमध्ये विद्यार्थी लौकिक सुरेश नांद्रेकर याने ९५,६० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. तर वेदांत सचिन गुळवणे हा ९०.८० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर अक्षता सचिन पाटील हिने ८८.२० टक्के गुण मिळवून तिसऱ्या क्रमांक मिळवला. तर प्रेमजीत शामगोंडा पाटील, शुभम भरत घोरपडे, श्रावणी भरत पाटील, वैभवी अरुण रसाळ, शिवम शितलकुमार हवालदार, मानसी मोहन कापणार या विद्यार्थी विद्यार्थिनींनी 80 टक्के होऊन अधिक गुण मिळवले. तर प्रथमेश विजय वायदंडे याने ३८.२० टक्के गुण मिळवून शाळेच्या शंभर टक्के निकाल लावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या  विद्यार्थी विद्यार्थिनींचा गुरुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ज्ञान प्रबोधिनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी यश मिळवत संस्था आणि पालकांचा गौरव वाढविला आहे. गोरगरीब आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व संस्कारक्षम शिक्षण देण्याचे कार्य विद्यालया मार्फत सातत्याने केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शिस्त, संस्कार आणि स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला जातो. आजच्या काळात अनेक ठिकाणी मराठी शाळा बंद पडत असताना, ज्ञान प्रबोधिनी विद्यालयाने मराठी माध्यमातून उत्कृष्ट शिक्षण देत शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना सक्षम करण्याचे कार्य संस्था प्रभावीपणे करत असून, या यशामुळे परिसरातून विद्यालयाचे कौतुक होत आहे. विद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!