सध्या जिल्ह्यासह राज्यामध्ये गाजत असलेला स्मार्ट मीटर च्या प्रश्नावर उपाय म्हणून महावितरण ने सांगलीमध्ये एक मेळावा आयोजित केला. यामध्ये थेट ग्राहकांच्या स्मार्ट मीटर बद्दल असणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यामध्ये तब्बल ४०० विद्युत ग्राहकांनी सहभाग नोंदवला तर ३०० हुन अधिक तक्रारींचे ऑन द स्पॉट निराकरण करण्यात महावितरण च्या अधिकाऱ्यांना यश मिळाले. अशी माहिती अधीक्षक अभियंता अमित बोकील आणि कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. ते म्हणाले या तक्रारींमध्ये ५३ तक्रारी विहित मुदतीत निकाली काढण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. या मेळाव्यामध्ये सांगली शहरातून १०० पैकी १०० तक्रारींचा निपटारा झाला आहे. तर सांगली ग्रामीण भागातून ३० पैकी २१, कवठेमहांकाळ मधील ९५ पैकी ८१ इस्लामपूर विभागात ५८ पैकी ३३ आणि विटा विभागात १२६ पैकी १२१ तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. या मेळाव्यामध्ये सौर कृषी पंप नव्या वीज जोडण्या वाढीव बिले कृषी पंप भार कमी करणे आणि इतर तांत्रिक अडचणी बाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने स्मार्ट मीटर चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी शासनाच्या कृषी क्षेत्राशी संबंधित महावितरण च्या विविध योजना ची माहिती देण्यात आली या मेळाव्यामुळे आमच्या वियुत ग्राहकांमध्ये एक समाधानाचे वातावरण बनल्याचे आम्ही अनुभवले असल्याचे मत यावेळी अधीक्षक अभियंता अमित बोकील यांनी व्यक्त केले.
Leave a Reply