Advertisement

पाचोरा :- रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून जागतीक महिला दिनी सन्मान

  पाचोरा :- रोटरी क्लब पाचोरा भडगाव कडून जागतीक महिला दिनी सन्मान

पाचोरा :- रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्या कडून जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने पाचोरा भडगाव तालुक्यातील 25 महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबचे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, उपप्रांतपाल किरण देशमुख, रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, डॉ अजयसिंग परदेशी यासोबत मंचावर पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन पीएसआय कल्याणीजी वर्मा यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांना आशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड प्राप्त झालेल्या सर्व शैलेश कुलकर्णी यांच्या कलाछंद टीम चे मेडल व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. रोटरीने घेतलेल्या गणपती आरास सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. महिला दिनाच्या सत्कार यामध्ये प्रामुख्याने नगराध्यक्षा सुनीताताई पाटील,कल्याणी वर्मा पीएसआय, तहसीलदार शीतल सोलाट, उद्योजीका वैशाली सूर्यवंशी,सुरेखा खानोरे गायत्री परिवार, उज्वला वाडेकर जिप शिक्षिका,संगीता शिंदे मॅनेजर स्टेट बँक ऑफ इंडिया,डॉ संगीता पाटील, रिलस्टार क्रांती पाटील,डॉ प्रतिभा ढाकरे,कुंदा पाटील पर्यवेक्षिका,सपना शिंदे शिक्षिका,रुपाली सांगडे,अनुपमा शेवाळे,चारुशीला नैनाव,दुर्गा राठोड प्रगती शेळके नगर पालिका पाचोरा शीतल सूर्यवंशी,ममता अग्रवाल,रुपाली जोशी तांबूल उद्योजीका, इशिता सेठ उद्योजीका, जयश्री मराठे योग शिक्षिका, अश्विनी पिंगळे पिग्मी एजन्ट,स्नेहा पवार,आशा भुजंगे रिक्षा चालक,सुनीता चव्हाण सफाई कामगार नगर पालिका अशा विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्यात आला.यावेळी विशेष सत्कारदेखील करण्यात आले. रोटरी सदस्य कै अरुणा उदावंत यांचे रोटरी क्लब योगदान यासाठी त्यांचे कुटुंबीय, दत्तात्रय पाटील अग्निशमक अधिकारी पाचोरा, मुकबधिर निवासी विद्यालय पिंपळगाव हरे आणि मानवेल सालोमन जॅक्सन डान्स अकॅडेमी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी रोटरी क्लब सदस्य प्रामुख्याने भरत सिनकर,वैशाली सूर्यवंशी,डॉ घनश्याम चौधरी,डॉ किशोर पाटील,संजय कोतकर,प्रदिप पाटील,राजेश मोर,निलेश कोटेचा,ज्ञानेश्वर पाचोळे,गिरीश दुसाने,डॉ पवनसिंग पाटील,डॉ अमोल जाधव,डॉ बाळकृष्ण पाटील,डॉ पंकज शिंदे, डॉ सिद्धांत तेली, डॉ स्वप्नील पाटील,डॉ मुकेश राठोड, उज्वल ठाकरे,डॉ कुणाल पाटील,मनोज केसवानी,चिंतामण पाटील,पिंकीताई जिनोदिया, रावसाहेब पाटील,नितीन तायडे,अमोल झेरवाल,डॉ प्रतिभा तेली,हर्षदा कोतकर,सौ विद्या कोतकर,प्रतिभा लहिवाल, यासोबत रोटरीचे नुतन सदस्य डॉ किरण राजपूत,डॉ रोहित तावरे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ शिवाजी शिंदे व डॉ प्रशांत सांगडे यांनी केले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!