Advertisement

आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने 250 गरजूंना फराळाचे वाटप

आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने 250 गरजूंना फराळाचे वाटप

सोलापूर प्रतिनिधी संतोष दलभंजन


महाशिवरात्री हे एक प्रमुख हिंदू पर्व आहे जे भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे.हे फाल्गुन मांसाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला मानले जाते तर सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी हिंदू धर्माचे आराध्य दैवत महादेव यांच्या महाशिवरात्री दिनानिमित्त शहरातील गोर,गरिब, वंचित,बेघर,निराधार अपंग यांना सामाजिक संस्थेच्या वतीने उपवास निमित्ताने शाबु खिचडी,शेंगा लाडू, बटाटा चिवडा, वेफर्स,राजगिरी लाडू, ताक, केळी इत्यादीचा वाटप करून त्यावर गरिबांना पुण्य प्राप्त केले. समाजातील दीनदुबळ्यांना देखील परमेश्वराची उपासना करता यावी यासाठी आस्था सामाजिक संस्थेने फराळीचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

या वाटपा प्रसंगी नवनिर्वाचित अनंत ( नेता) जाधव नगरसेवक, विनायक विटकर ( नगरसेवक) गौतम कसबे( नगरसेवक) अमोल पाटील (मांगोबा मंदिराचे पुजारी) आनंद तालिकोटी ( अध्यक्ष आस्था सामाजिक संस्था), शिवानंद सावळगी ( सचिव आस्था सामाजिक संस्था) योगेश कुंदुर ( संचालक आस्था सामाजिक संस्था) गणेश कोरे ( समाजसेवक) सुशीलकुमार व्यास ( उद्योगपती) पंकज पाटील यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले.
या फराळ वाटपासाठी शहरातील दानशूर व्यक्ती अंजली शहा ( श्राविका संस्थेच्या विश्वस्त) दिपक अर्वे ( माजी सहाय्यक पोलीस आयुक्त) सुशीलकुमार व्यास ( उद्योगपती) अनिता पाटील, कांचन आगवणे यांनी आर्थिक स्वरूपात सहकार्य केले.
या फराळ वाटप प्रसंगी सुहास छंचुरे,वेदांत तालिकोटी, महेश नागणसुरे, सुरज छंचुरे,उदय छंचुरे, गिरीश विजापुरे, नितीन भांडेकर, दशरथ इरकल, यांनी परिश्रम घेतले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!