पाचोरा : पाचोऱ्यात सेवाभावी संस्थाकडून स्वच्छता अभियान

पाचोरा : नगरपालिका, रोटरी क्लब पाचोरा भडगाव, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन, अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या सौजन्याने सेवा पंढरवडा या अंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान यामध्ये शिवाजी महाराज चौक, भाजी मंडी, मार्केट एरिया यामध्ये स्वछता करण्यात आली. नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे, उपमुख्याधिकारि सोनावणे साहेब, मराठे साहेब, रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन चेअरमन डॉ जीवन पाटील, रोटरीचे सचिव व पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन अध्यक्ष डॉ अजयसिंग परदेशी, ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष व प्रांत सचिव डॉ अनिल देशमुख,उपाध्यक्ष डॉ विजय जाधव, रोटरी सदस्य चंद्रकांत लोढाया, संजय कोतकर, डॉ अमोल जाधव, डॉ पवन पाटील, डॉ किशोर पाटील, प्रज्ञेश खिलोशिया, डॉ नंदकिशोर पिंगळे, डॉ प्रशांत सांगडे, डॉ कुणाल पाटील, संजय पाटील, डॉ चेतन पाटील,डॉ नितीन जमदाडे, नितीन तायडे, चेतन सरोदे,नगरपालिका पदाधिकारी व कर्मचारी यासोबत गो से हायस्कुल उपशिक्षक, स्काउट गाईड चे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच इंटरेक्ट क्लब चे विद्यार्थी,मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली. आठवड्यातून दोन तास तर वर्षातून शंभर तास श्रमदान करावे असा संदेश या माध्यमातून दिला गेला. या स्वच्छता अभियानाचे कौतुक केले जात आहे.



















Leave a Reply