Advertisement

सांगली मध्ये अमृत मेळावा संपन्न..

रिपोर्टर सुधीर गोखले सांगली


खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळा कडून शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही, अशा प्रवर्गा साठी महाराष्ट्र शासनाची अमृत स्वतंत्र स्वायत्त संस्था आणि सांगली जिल्ह्यातील सर्व ब्राह्मण संघटनाच्या वतीने रविवार दिनांक २४ ऑगस्ट रोजी भव्य मेळावा पार पडला.
या मेळाव्यात अमृत चे व्यवस्थापकीय संचालक मा. विजय जोशी यांनी अमृत च्या विविध योजनांची विस्तृत माहिती दिली. मेळाव्यासाठी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांची मुख्य उपस्थिती होती. स्वागत प्रास्ताविक धनंजय खाडिलकर यांनी केले. सौ मंजिरी ताई गाडगीळ यांनी या योजनांचे महत्व विषद केले. यावेळी ब्राह्मण सभा सांगली चे अध्यक्ष केदार खाडिलकर, शेखर इनामदार, अरुण कुलकर्णी, विवेक भिडे, मंगेश ठाणेदार, वैभव उरणकर, प्रदीप देशपांडे, वैभव कुलकर्णी, भारती दिगडे, यांच्या सह जिल्ह्यातील मोठया प्रमाणावर ब्राह्मण समाजातील बंधू भगिनी उपस्थित होते.
यावेळी अमृत च्या विविध योजनांच्या माहिती देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!