Advertisement

सुरजागड खाण परिसरातील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल चे वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा

सुरजागड खाण परिसरातील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल चे वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा

 

✒️ पियूष गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ✒️
📲9423170716

एटापल्ली :- ०८/१२/२०२४ रोजी, मौजा हेडरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल ला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्याने
दवाखान्याच्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली सारख्या अतिदुर्गम भागातील जनसमुदायाच्या दूरवर दवाखान्याचा सबंध येत नसल्याने श्री. बी. प्रभाकरन, व्यवस्थापकीय संचालक लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड आयर्न ओर माइन्स सुरजगड यांच्या संकल्पनेतून सुरजागड खाण परिसरातील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल ची निर्मिती करून परिसरातील सर्व जनसमुदायाला निःशुल्क सेवा सुरू केली. आत्तापर्यंत 30 खाटांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल पुरेशा व्यवस्थापनासह समाजातील सर्व घटकांना सर्व मुलभूत आणि अत्याधुनिक सेवा पुरविते, उपलब्ध सुविधा पैकी प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, अस्थिव्यंगतज्ज्ञ, जनरल सर्जन जनरल मेडिसिन. त्वचारोगतज्ज्ञ भूलतज्ज्ञ कान नाक घसा विशेषज्ञ धनी. चिकित्सक. आहारतज्ञ, अतिदक्षता विभाग मद्ये एनआयसीयू, बाह्यरुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभाग करिता एकूण १२ अनुभवी व तज्ञ डॉक्टर यांचे कडून उपचार व ४० कौशलीपूर्ण नर्स व सहकारी स्टाफ याद्वारे तीन पाळी मध्ये २४ तास कार्यरत. निदान सुविधा मद्ये पाथोलाजी, सोनोग्राफी स्त्रियांसाठी. डिजिटल एक्सरे, ईसीजी टीएमटी, स्पायरोमेट्री, ऑडिओमेट्री. वैदू चिकित्सालय – नैसर्गिक पद्धतीने उपचार, तसेच गावातील वैद्य याद्वारे उपचार व मार्गदर्शन. आत्तापर्यंत एक वर्षामध्ये ६१,००० हजाराहून अधिक रुग्ण या हॉस्पिटलद्वारे उपचार घेतलेले आहेत. तसेच शंभरच्यावर यशस्वी प्रसूती या दवाखान्यात झालेले आहेत. बाह्यरुग्ण विभाग ओपीडी दर सोमवार ते शनिवार सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत, तसेच आपत्कालीन सेवा 24 तास उपलब्ध. अतिरिक्त सेवा म्हणून ग्रामपंचायत पूरूसलगोंदि, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील लोकांना मोफत रुग्णवाहिका सेवा, ग्रामपंचायत पूरूसलगोंदि, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील गर्भवती महिला यांना तपासणी व प्रसूती साठी मोफत ॲम्बुलन्स 24 तास सेवा. ग्रामपंचायत पूरूसलगोंदि, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील कुपोषित मुले व मुली कुपोषणमुक्त बालक कार्यक्रम अंतर्गत दवाखान्यामध्ये उपचार व आहार पुरवठा. ग्रामपंचायत पूरूसलगोंदि, नागुलवाडी व तोडसा अंतर्गत गावातील लोकांना सिकलसेल, एनेमिया, मलेरिया, हिवताप बाबत मोफत उपचार व मार्गदर्शन. सर्व गावामध्ये प्रथम उपचार पेटीद्वारे तात्काळ उपचार व माहिती देणे. गावातील महिला व किशोर वयातील मुली यांना सखी- सहेली कार्यक्रम अंतर्गत एकूण 2216 मुली व महिला मोफत सनिटरी पेड वितरण करून जनजागृती केलेली आहे सदर परिसरात निःशुल्क सेवेत असलेल्या सर्व जनतेला या दवाखान्याचा एकदम सोयी सुविधा नी आरोग्य सेवा घेत असल्याने लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलची सर्वत्र चर्चा होत आहे.
व आज याच निःशुल्क आरोग्य सेवेला एक वर्ष पुर्ण झाल्याने
लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलच्या वर्धापन दिनाचे आयोजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले.

या दवाखान्यात एक वर्ष पूर्ण निःशुल्क मोफत सेवा देणारे डॉक्टर, नर्सिंग स्टाफ सोबत सर्व कर्मचाऱ्यांचे शाल व श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आले. यासोबतच सर्व तीन ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि गाव पाटील यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी श्रीमती अरुणताई सडमेक, सरपंच ग्रामपंचायत – पुरसलगोंडी, श्री राकेश भाऊ कवडो उपसरपंच ग्रामपंचायत – पुरसलगोंडी, श्री. राजूभाऊ तिममा उपसरपंच ग्रामपंचायत, नागुलवाडी, कु. वनिताताई कोरामी सरपंच ग्रामपंचायत. तोडसा, श्री साई कुमार, श्री. भोलू भाऊ सोमानी, श्री. संजय चांगलाणी, डॉ. सनी सलूजा,
वेदांत जोशी, रोमित, टी.ए.बास्कर, राम कुमार, अरुण रावत, सुनीता मेहता, विक्रम मेहता, श्री. दुल्हत साहेब पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन हेडरी, डॉ. श्री. गोपाल रॉय, डॉ. श्री. चेतन बुरिवार, डॉ. प्रीती बुरिवार, श्री. कटिया तेलामी माजी उपसरपंच हेडरी.श्री लालसाय तलांडे भूमीया सुरजागड, श्री.मधुकरजी सडमेक सदस्य ग्रामपंचायत – पुरसलगोंडी, श्री.माधव जी गावडे पोलीस पाटील नागुलवाडी , दस्साजी कोरामी पोलीस पाटील पेठा, श्री.लालसुजी रापणजी पो. पा कारंपल्ली , श्री. बेंजामिन टोप्पो पोलीस पाटील मलमपाडी, श्री.संजय जेट्टी पोलीस पाटील इतुलनार , श्री.दिनेश पुंगाटी पोलीस पाटील अलेंगा,श्री विनोद भाऊ नरोटी ग्रामपंचायत सदस्य तोडसा, श्री देऊ पुंगाटी प्रतिष्ठित नागरिक कुदरी श्री.साधूजी गुंडरू भूमीया, श्री. झुरू कावडो प्रतिष्ठित नागरिक हेडरी ,श्री.गोसुजी हिचामी पोलीस पाटील मंगेर,श्री. पेकाजी गुंडरू पोलीस पाटील बांडे ,श्री. बिरजू गावडे पोलीस पाटील बोडमेटा ,श्री.संभाजी गोटा पोलीस पाटील एकरा खुर्द, श्री. रैनु जी नरोटे पोलीस पाटील झारेवाडा,श्री.नितीन तोडेवर प्रतिष्ठित नागरिक ,
श्री.बाजू मट्टमी प्रतिष्ठित नागरिक बांडे,श्री.मुन्ना भाऊ पुंगाटी सरपंच ग्रामपंचायत पिपली बुर्गी, सौ.कल्पना आलम माजी सरपंच सुरजगड, श्री. झुरु मासु गोटा पो.पा बोडमेटा, श्री. देवजी पाटील कावडो गाव पाटील हेडरी, गोसुजी हिचामी गाव पाटील मंगर, श्री. लाचुजी पाटील हेडो गाव पाटील हलूर, श्री. साधू गुंडरु गाव पाटील बांडे, श्री. मंगू कलमोती हेडरी श्री. जुरु कावडो हेडरी, श्री. अशोक हिचामी मान्यवर नागरिक हेडरी गाव, श्री. बाजी गुंडरु,श्री. रामजी गुंडरु बांडे गावातील मान्यवर नागरिक. हा कार्यक्रम मान्यवर नागरिक, आणि लॉयड्स अधिकाऱ्यांच्या व परिसरातील जन समुदायाच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!