सत्यर्थ न्यूज रिपोटर : प्रभाकर सरोदे
जोधपुर : प्रेयसी झाली IAS प्रियकराला दिला धोका, खचून न जाता प्रियकराने त्याच्या सत्य घटनेवर पुस्तक लिहून प्रियकर बनला कोट्याधीश.
जोधपुर : प्रेयसी झाली IAS प्रियकराला दिला धोका, खचून न जाता प्रियकराने त्याच्या सत्य घटनेवर पुस्तक लिहून प्रियकर बनला कोट्याधीश. जिल्ह्यातील लोहावत येथील एका शेतकरी कुटुंबातील मुलगा सध्या चर्चेत आहे. कैलाश मांजू असे या तरुणाचे नाव आहे. कैलासने यूपीएससी वाला लव्ह कलेक्टर साहिबा हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकातील कहाणी ही सत्य घटनेवर आधारित आहे. कैलाशची प्रेयसी ही UPSC परीक्षा पास झाल्यानंतर IAS बनते व प्रियकराला सोडून जाते. यातील अनेक किस्से या पुस्तकात नमूद करण्यात आलेले आहेत.
त्यामुळे हे पुस्कत वाचकांच्या पसंतीस उतरले आहे. सोशल मीडियावर कैलाश मांजूचे ‘UPSC वाला लव्ह कलेक्टर साहिबा’ हे पुस्तक खूप चर्चेत आहे. ज्या लोकांनी ते वाचले आहे त्यांच्या मते हे पुस्तक खूप चांगले आहे. त्याची कथा, ती लिहिण्याची पद्धत, सगळंच छान आहे. प्रत्येकजण कैलाशच्या लेखनाचे कौतुक करत आहे. कैलास यांनी त्यांच्या वैयक्तिक अनुभवाच्या आधारे ते लिहिले आहे. मात्र,या पुस्तकातील अनेक पात्रेही काल्पनिक आहेत. त्यामुळे या पुस्तकातील कथेतील रंगत आणखी वाढली आहे. या पुस्तकाबाबत बोलताना कैलाश मांजू म्हणाले की, ‘UPSC वाला लव्ह कलेक्टर साहिबा हे पुस्तक एक प्रकारे UPSC ची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या संघर्षाची कहाणी आहे.ज्यामध्ये एक कलेक्टर बनण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाचा प्रवास आहे. दिल्लीत शिकत असताना प्रियकर एका मुलीच्या संपर्कात येतो. तिथे दोघे मित्र बनतात आणि एकमेकांच्या प्रेमात पडतात. मात्र मुलगी चांगल्या रँकसह IAS बनते. त्यानंतर हळूहळू हे दोघे वेगळे होतात. ती मुलाला सोडून कशाप्रकारे जाते अशी संपूर्ण प्रेमकथा या पुस्तकात रेखाटण्यात आलेली आहे. दरम्यान, कैलाश मांजू यांचा जन्म जोधपूर येथे झाला. जोधपूरमधूनच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले. पदवी घेतल्यानंतर त्यांनी UPSC ची तयारी केली. यावेळी त्यांनी 2022 मध्ये हे पुस्तक लिहिले आणि पाच महिन्यांत ते प्रकाशित झाले. पुस्तक सुपरहिट झाले आहे. त्यामुळे कैलाश लखपती झाले आहेत. या पुस्तकावर चित्रपट बनवण्याची ऑफरही कैलाश यांना आली आहे. कैलाश मांजू यांच्या मते, संपूर्ण जगात हे हिंदी भाषेतील सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक आहे. हे एक स्वयंप्रकाशित पुस्तक आहे, ज्याचा संपूर्ण लाभ कैलासला मिळत आहे. आता हे पुस्तक मराठी, गुजराती आणि इंग्रजी भाषेतही प्रकाशित केले जाणार आहे. सध्या या पुस्तकाची कमाई दीड ते अडीच कोटींच्या दरम्यान आहे