रिपोटर : सागर माहोर
भडगांव : गुन्ह्याची तात्काळ उकल करणाऱ्या पोलिसांचा सन्मान…
भडगाव पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याच्या तपासात दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली मोटरसायकल व इतर दोन मोटरसायकली हस्तकद करून गुन्हा उघडकीस आणला तसेच दुसऱ्या गुन्ह्याचा देखील उलगडा करत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करून त्याच्याकडून चोरून नेलेले 120 ग्रॅम सोने रायपूर छत्तीसगड येथून हस्तगत करण्यात आले म्हणून पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडून दिनांक 20 जुलै रोजी दुपारी 12.00 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस हवालदार किरण पाटील, पोलीस हवालदार निलेश ब्राह्मणकर, पोलीस कॉन्स्टेबल सुनील राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल संदीप सोनवणे अशांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

















Leave a Reply