सरकारला अल्टिमेट आजची रात्र तुमची . 20 तारखेपासून जरांगे
पाटील पुन्हा बसणार उपोषणाला.
प्रतिनिधी गणेश निंबाळकर.
मराठ्यांची युद्ध मनोज पाटील जरांगे यांची मराठवाड्यामध्ये शांतता रॅलीचे आयोजन केले होते हिंगोली नांदेड परभणी बीड धाराशिव जालना त्यानंतर आता आज छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी त्या रॅलीचा समारोप करण्यात आला त्यांनी वेळ सांगितले की आमचा निजाम कालीन अध्यादेश व सगेसोयरे हे कायदे जोपर्यंत पास करत नाही जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार सरकारने आम्हाला एक महिन्याची मुदत दिली होती त्यामुळे आम्ही उपोषण मागे घेतलं होतं परंतु आज 13 तारीख आहे शेवटची तारीख ही सरकारकडून हुकली कुठलीच हालचाल ही झाली नाही परंतु 20 तारखेपासून आम्ही पुन्हा उपोषण सुरू करणार आहोत आता 288 आमदार पाडायचे की घडवायचे आताही आम्ही वीस तारखे नंतरच ठरवू .काही लोकांना दंगली घडून आणायचे आहेत म्हणून ते काही हालचाली करताहेत परंतु आम्ही कुठल्याही प्रकारे दंगल घडवण्याचा प्रयत्न करत नाही आमचे मोर्चे हे आत्तापर्यंत 58 मोर्चा आम्ही काढले आहेत शांत मार्गानेच आमचे मोर्चे निघालेले आहे प्रतिपादन मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांनी आज छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी केले.