Advertisement

लातूरच्या वेड्या तरुणांनी रचला इतिहास हरित क्रांती चा

लातूर : 

लातूरच्या वेड्या तरुणांनी रचला इतिहास हरित क्रांती चा..

 

दुष्काळी लातूर,ज्या ठिकाणी रेल्वेने पाणी आणलं होत ही प्रतिमा पुसून हरित लातूर ही नवी ओळख निर्माण करून दिली.

ग्रीन लातूर वृक्ष टीम हे नाव असलेल्या टीम सदस्यांनी

सातत्याने १४८० दिवस, एकही दिवस सुट्टी न घेता हो दररोजच्या दररोज चार तास कार्य करत या ध्येय वेड्या लोकांनी चार वर्षांत चक्क एक लाख दहा हजार झाडे स्वहातांनी लावून जगवली त्याबरोबरच शहरातील इतर झाडे सुद्धा जगवली. झाडे लावल्या नंतर ते थांबले नाहीत त्या झाडांना दर आठवड्यात पाणी देण्यासाठी ५ लहानमोठी टॅंकर भाड्याने घेतली.

या उन्हाळ्यात देखील दररोज ५-६ टॅंकर पाणी वापरून झाडे जगवली जात आहेत. पाण्यावाचून एकही झाड वाळू दिले नाही.

मंदिर, मज्जीद, स्मशानभूमी, कबरस्थान, रस्ता दुतर्फा, रस्ता दुभाजक, शाळा, कॉलेज, महाविद्यालय, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, पोलीस स्टेशन, पोलीस अधीक्षक कार्यालय, महापुरुषांची पुतळ्यांचा परिसर, महावितरण कार्यालयांची ऑफिस, न्यायालय, पशू वैद्यकीय चिकित्सालय ऑफिस अशा विविध ठिकाणी असंख्य झाडे लावून झाडे जगवली. ठिकठिकाणी सुंदर असे बगीचे तयार करून दिले. १४ -१५ ओसाड उनाड जागेवरती घनदाट वन प्रकल्प उभे केले. प्रचंड मेहनत, प्रचंड श्रम, प्रचंड कष्ट घेत दररोज चार तास श्रमदान करत ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या या ध्येयवेड्या तरुणांनी लातूर शहर अल्पावधीत हरित करून टाकलं. आज उंच उंच गेलेली झाडे, मोठी झालेली झाडे, झाडाखाली सावलीमध्ये व्यवसाय करणारे लोक, झाडाखाली सावलीमध्ये लावलेली वाहने, उन्हाळ्यात शहरातील कमी झालेले तापमान ही सगळी यांच्या कष्टाची पावती आहे.

या टीम मध्ये डॉक्टर, वकील, सीए, इंजिनियर, पत्रकार, नगरसेवक, प्रगतशील शेतकरी, आय.टी. इंजिनियर, विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, पोलीस, उद्योजक, शिक्षक, प्रोफेसर सर्व स्तरातील व्यक्ती आहेत. ८० जणांची असलेली ही टीम दररोज १५ ते २० जणांना एकत्र येऊन रोटेशन पद्धतीने चार तास श्रमदान करतात. जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ भेटेल लातूरला येऊन यांनी केलेले शास्वत कार्य तुम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकता. लातूरमध्ये झालेला बदल, हरित वृक्षक्रांती प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवू शकता. नुसतं झाड लावून झाड जगवणं हे एकच कार्य न करता स्मशानभूमी स्वच्छता, रस्ता दुभाजक स्वच्छता, कॅरीबॅग निर्मूलन, प्लास्टिक निर्मूलन, कचरा पेटवू नये विरुद्ध आंदोलन, इको ब्रिक्स, कापडी पिशव्यांचे वाटप, पोस्टर फ्री लातूर, बीजगोळे, बियांचे पॅकेट वाटप, विविध प्रसंगी फुलझाडे वाटप, दुर्मिळ बिया संकलन, दुर्मिळ आयुर्वेदिक झाडांचे रोपण, झाडांचे पुनश्च रोपण असे विविध उपक्रम यांनी राबवलेले आहेत. सोबतच बाग परीक्षण, उत्कृष्ट बाग स्पर्धा, बोन्साय बनवणे कार्यशाळा, कुंडीमध्ये माती भरणे कार्यशाळा अशी विविध उपक्रम सुद्धा यांनी घेतलेले आहेत.

विशेष म्हणजे हे सर्वजण स्वयंस्फूर्ती ने कार्य करतात. या चळवळीस कुणीही अध्यक्ष किंवा पदाधिकारी नाहीत. कडुनिंब झाड अध्यक्ष व इतर झाडे सदस्य.

ग्रीन लातूर वृक्ष टीम येथे झाडे लावली जातात व संगोपन केलं जातं

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!