लोणी बुद्रुक व भगाव येथे स्मार्ट कॉटन हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण संपन्न
प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर
दिनांक 25 मे रोजी लोणी बुद्रुक व भगावं येथे स्मार्ट कॉटन प्रकल्प अंतर्गत खरीप हंगाम पूर्व शेतकरी प्रशिक्षण व खरीप हंगाम मोहीम कार्यक्रम आयोजित करण्यात आला
यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतेवेळी मंडळ कृषि अधिकारी वैजापूर श्री विशाल साळवे यांनी सांगितले की सण २०२४-२५ खरीप हंगामासाठी वैजापूर तालुक्यात जागतिक बँक अर्थ सहाय्यता बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत स्मार्ट कॉटन मूल्य साखळी विकास प्रकल्प राबविण्यात येत असून या अंतर्गत निवडलेल्या गावांमध्ये शेतकरी एक गाव एक वान संकल्पना आधारित लांब धाग्याच्या जिनशी कपाशी वानाशी लागवड करणे व प्रात्यक्षिक राबवून प्रकल्पांतर्गत स्वच्छ कापूस वेचणी करून शासनाने नेमून दिलेल्या जिनिंग मिलवर शेतकरी गट स्वतः गाठी तयार करून घेऊन त्या गाठी राज्य शासनाच्या महाकॉ ट ~पी आय यु यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली ई ॲक्शन पद्धतीने विक्री करून दर्जा आधारित प्रीमियम किंमत मिळवणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून अधिक उत्पन्न मिळणार आहेत या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना कापूस उत्पादन मूल्य व मूल्य साखळी विकास शाळा सुद्धा आयोजित करण्यात येणार आहेत या प्रकल्पात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन मंडळ कृषी अधिकारी विशाल साळवे यांनी केले आहे
याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक भाऊसाहेब खेमनर यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी विषयी मार्गदर्शन केले तसेच कृषी पर्यवेक्षक विशाल दांगोडे यांनी हुमणी नियंत्रण मोहीम विषयी माहिती दिली खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये जनजागृती आणण्याकरिता तालुका कृषी अधिकारी श्री व्यंकट ठक्के यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबविण्यात येत असून कृषी कार्यक्रमांचे यशस्वी रीतीने करिता परिश्रम घेतले कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात शेतकरी व महिला उपस्थित होत्या