Advertisement

कृपामाई एम एस ई बी सब स्टेशन खून प्रकरण: दोन संशईत आरोपी गजाआड: महात्मा गांधी चौक पोलिसांची धडक कारवाई

प्रतिनिधी सुधीर गोखले

मिरजेतील महावितरण कंपनीच्या कृपामाई सब स्टेशन मध्ये काल रात्री ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे याचा अनोळखी व्यक्तींनी डोक्यात रॉड घालून निर्घृण खून केला होता या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सांगली जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या निर्देशानुसार तसेच सांगली चे पोलिस विभागीय अधिकारी संदीप भागवत आणि मिरज चे प्रभारी पोलीस विभागीय अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने या प्रकरणाची चक्रे फिरवायला सुरुवात केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या सहयोगाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या प्रकरणी दोन संशइत आरोपींना आवघ्या पाच तासा मध्ये जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून या दोघा आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून याबाबत अधिक माहिती देताना पोलिस निरीक्षक संदीप शिंदे म्हणाले या सब स्टेशन मध्ये सुरक्षेसाठी मेस्को या कंपनीतर्फे सुरक्षा रक्षक नेमले आहेत यातील संतोष निकम हे एक सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहेत यांचा आणि मयत ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे याचा काही कारणावरून वाद झाला या वादातून संतोष निकम यांचा मुलगा सौरभ संतोष निकम याने त्याचा साथीदार विनायक विक्रम सावंत यांच्या साथीने मयत ऑपरेटर सुधीर पंडित लाटवडे यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर लोखंडी रॉड ने वार केले त्यामुळे जागीच ऑपरेटर मयत झाला. सदर गुन्ह्यामध्ये इतक्या कमी वेळेमध्ये अगदी नगण्य माहितीनुसार महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने अत्यंत शिताफीने अगदी कमी वेळेमध्ये या दोघांना ताब्यात घेतल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!