Advertisement

अल्लाबक्ष काझी यांनी कोर्ट कामात आमच्या नावे बनावट सह्या आणि प्रतिज्ञापत्र सादर करून आमची फसवणूक केली: शकील पिरजादे

प्रतिनिधी सुधीर गोखले

मिरज मधील सध्या चर्चेत असलेले बनावट हिब्बानामा प्रकरणी गुन्हा दाखल झालेले अल्लाबक्ष काझी त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असून त्यांच्या विरोधात काल आणखी एक तक्रार मिरज शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. याबाबत तक्रारदार शकील पिरजादे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले, सध्या अल्लाबक्ष काझी यांच्या विरोधात बनावट हिब्बानामा बनवून फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे या त्यांच्या कोर्ट कामात सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये माझे आमचे सहकारी मित्र संतोष माने तसेच बाळासाहेब पाटील अशी आमची तिघांची नावे नोटरी सपकाळ यांच्याकडे त्यांनी केली आहेत मात्र आम्ही हे प्रतिज्ञा पत्र करत असताना उपस्थित नसतानाही त्यांनी आमच्या बोगस सह्या आणि अंगठे त्या कागदपत्रांवर केले आहेत या मुळे या प्रकरणी आम्ही आज रीतसर तक्रार मिरज शहर पोलिस ठाण्यामध्ये दाखल करत आहोत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!