मिरजेमधील पंढरपूर रस्त्यावरील डॉ बापूजी साळुंखे महाविद्यालय नजिक मिरज शहर वाहतूक पोलिसांनी शेकडो रोड रोमियो वर कारवाई करत यापुढे बेदकार वाहने चालवणे महागात पडणार असल्याचा एक प्रकारे एशारा दिला आहे. नुकताच मिरज शहर वाहतूक पोलीस विभागाचा कार्यभार स्वीकारलेले रणजित तिप्पे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अशा प्रकारे सुसाट वाहने चालवणाऱ्या दुचाकी स्वारा वर कारवाई करत भविष्यात अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून महाविद्यालय या रस्त्यालगत असल्याने नेहमी या रस्त्यावर वर्दळ असते त्यात या रोड रोमियो मुळे महिला व विद्यार्थिनी ना येजा करणे मुश्किल बनले होते. वाहतूक पोलीस निरीक्षक रणजित तीप्पे यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी आपल्या कर्मचारी आणि सहकाऱ्यांसह महाविद्यालय नजिक अशा रोड रोमियो वर दंडात्मक कारवाई केली. यामध्ये दुचाकी चालकाचा वैध लायसन सह इतर कागदपत्र तपासली गेली.
Leave a Reply