महाराष्ट्रातील देशविदेशातील पर्यटकांना नेहमी भुरळ घालणारे पर्यटन स्थळ म्हणजे लोणावळा येथील चिक्की ची परंपरा तर शेकडो वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण राहिली आहे. भारत सरकारच्या चेन्नई येथील भौगोलिक मानांकन नोंदणी कार्यालयाने लोणावळ्याला चिक्की ऑफ लोणावळा नावाने जगाच्या पाठीवर एक नवी आणि वेगळी ओळख दिली आहे. हे मानांकन मिळण्यासाठी २९ ऑगस्ट २०२३२ रोजी अर्ज दाखल करण्यात आला होता. २८ मार्च २०२६ रोजी अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. यामुळे आता लोणावळा चिक्की या नावाने अनधिकृत वापर करता येणार नाही. भौगोलिक मानांकनानुसार स्थानिक चिक्की उत्पादकांना आता व्यवसाय करणे सुरक्षित होईल. तर येथे येणाऱ्या पर्यटकांना अस्सल चिक्कीचा आस्वाद यापुढे घेता येईल त्याचप्रमाणे देशांतर्गत आणि विदेशात या उत्पादनाची विश्वासहार्यता वाढून निर्यातीला चालना मिळण्याची अशा पल्लवित झाल्या आहेत. चिक्की मध्ये शेंगदाणा गूळ साखर तीळ काजू बदाम पिस्ता आदी घटक वापरले जातात. लोणावळ्याची या चिक्की मुळे एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. लाखो पर्यटकांच्या जिभेवर चिक्कीची चव नेहमी रेंगाळत असते. या मानांकनासाठी लोणावळा शहर चिक्की असोसिएशन चे अध्यक्ष अभयकुमार पारख यांनी विशेष पाठपुरावा केला तसेच बौद्धिक संपदा हक्क विषयातील तज्ज्ञ प्रा गणेश हिंगमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे मानांकन मिळण्यास मदत झाली.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply