संस्कार भारतीचे संस्थापक पद्मश्री योगेंद्रजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ यंदाचा ‘कलातपस्वी’ पुरस्काराची विद्यावाचस्पती डॉ.शंकर अभ्यंकर यांना जाहीर; २ ऑगस्ट रोजी होणार वितरणल; अध्यक्ष श्रीधर देसाई यांची माहिती
संस्कार भारती हि कला क्षेत्रामध्ये काम करणारी देशातील आघाडीची संस्था असून अनेक देशभरातील कलाकारांना घडवण्याचे कार्य संस्कार भारतीने केले आहे. संस्कार भरतीचे संस्थापक पद्मश्री योगेंद्रजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ मिरज महानगर संस्कार भारतीने गत वर्षांपासून कला तपस्वी पुरस्काराची सुरुवात केली असून, संपूर्ण आयुष्य कलेची तपस्वीपणाने सेवा करून कलाक्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या,तसेच आपली कला आपल्या शिष्यांद्वारे विकसित करणाऱ्या व्यक्तीस कलातपस्वी हा पुरस्कार देण्याचे ठरवले आहे. यंदा हा पुरस्कार विद्यावाचस्पती डॉ शंकर अभ्यंकर यांना हा जाहीर झाला असल्याचे संस्कार भारतीचे मिरज अध्यक्ष श्रीधर देसाई यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली ते म्हणाले संस्कार भारतीने नेहमीच [आपल्या कार्यातून समाजात एक वेगळेपण ठेवले आहे सतत वेगवेगळे प्रयोग संस्कार भारती करत असते मग ते सतेज शो असोत किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी भ्रमंती असो किंवा कला साधना जोपासणाऱ्या व्यक्तीचा मानसन्मान असो. संस्कार भारतीने आपल्या कार्यातून हे वेगळेपण निर्माण केले आहे मिरज महानगर संस्कार भरती संस्थेला नेहमी आमच्या मार्गदर्शिका आदरणीय श्रीमती राजश्री शिखरे ताईंची साथ मिळाली आहे. यंदा आम्ही हा पुरस्कार २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मिरजेच्या मुक्तांगण सभागृहात वितरित करणार आहोत हा पुरस्कार वितरणासाठी प्रमुख अतिथी असणार आहेत शाहीर हेमंतराजे मावळे, अध्यक्ष,संस्कार भारती,पश्चिम प्रांत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मिरजेचे लोकप्रिय आमदार डाॅ.सुरेश भाऊ खाडे हे भूषवणार आहेत. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त नृत्यगुरु अमिषा करंबेळकर या आपल्या शिष्यांसह नृत्यगंध या कथ्थक नृत्याच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. अमिषा करंबेळकर यांचाही या दिवशी सत्कार होणार आहे. सर्व कलारसीकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन श्रीधर देसाई यांनी यावेळी केले.
Leave a Reply