Advertisement

कल्याण- डोंबिवलीतील डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषधार्थ राज्यातील सोमवारी २४ तास वैद्यकीय सेवा IMA बंद ठेवणार

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर दवाखान्यातील डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी राज्यभरातील वैद्यकीय सेवा २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशन ने घेतला असून सोमवारी सकाळी ९ वाजता हि आरोग्य सेवा बंद होईल तर मंगळवारी सकाळी ९ वाजता पूर्ववत होईल मात्र आंदोलन दरम्यान प्रसुती किंवा आपत्कालीन सुरु राहणार असल्याचे IMA ने म्हणले आहे. शास्त्रीनगर येथील रुग्णालयात डॉ सृष्टी बाविस्कर आणि डॉ वैभव साळुंखे याना मारहाण झाली होती. त्यानंतर राज्यभर या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलने झाली यापुढे डॉक्टरांवरील असे हल्ले खपवून घेतले जाणार नसल्याचे IMA ने म्हणले आहे. गुरुवारी यासंदर्भात बैठक झाली यामध्ये अध्यक्ष डॉ संतोष कुलकर्णी राज्य सचिव डॉ विक्रांत देसाई आणि खजिनदार डॉ अमोल गीते उपस्थित होते यावेळी राज्यभरातील डॉक्टर या बैठकीला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते या बैठकीत सोमवारी राज्यव्यापी २४ तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. शास्त्रीनगर प्रकरणी राज्य सरकारने निष्पक्ष चौकशी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली असून पीडित डॉक्टरांना न्याय मिळवून द्यावा. महाराष्ट्र मेडिकेअर सेवा व्यक्ती मेडिकेअर सेवा संस्था अधिनियम २०१० मध्ये तात्काळ सुधारणा कराव्यात अशा प्रकारचे गंभीर हल्ले आणि शस्त्रांच्या वापरा संदर्भात घडणारे गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र करणे जलदगतीने म्हणजे एक महिन्यामध्ये तपास पूर्ण करून हे खटले जलदगती न्यायालयात चालवावे त्याचप्रमाणे अशा होणाऱ्या हल्ल्यामध्ये नुकसानभरपाई आणि वसुली ची अम्लभाजावणी प्रभावीपणे व्हावी. आरोग्य सेवांमध्ये राजकीय हस्तक्षेप किंवा धमक्या किंवा दडपशाही आणि दहशतीला तात्काळ आळा घालावा अशा पद्धतीने IMA ने मागण्या मांडल्या आहेत या मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही या बैठकीमध्ये दिला गेला आहे. या मध्ये सोमवारी सर्व नियमित ओपीडी बंद राहणार आहेत. नियोजित शस्त्रक्रिया आणि नियमित वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. या आंदोलनामध्ये ऍलोपथी, होमिओपॅथी तसेच सर्व प्रकारचे वैद्यकीय शाखा संघटना पॅरामेडिकल कर्मचारी आरोग्य कर्मचारी सहभागी होणार आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!