Advertisement

भाजप नगरसेविका सौ अपर्णा शेटे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

प्रभाग क्रमांक ४ मधील नगरसेविका सौ अपर्णा विवेक (बंडू) शेटे यांच्या जनसंपर्क कार्यलयाचे उदघाटन उद्या सकाळी १० वाजता राज्याचे उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री ना चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती पद्मावती शांतीसेवा फौंडेशन चे संस्थापक अध्यक्ष आणि उद्योजक विवेक (बंडू) शेटे यांनी दिली ते म्हणाले हे जनसंपर्क कार्यालय म्हणजे नागरिकांचे हक्काचे कार्यालय असेल या कार्यालयामध्ये पालकमंत्री कार्यालयात नागरिकांना मिळणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तब्बल चाळीस प्रकारच्या विविध सेवा आम्ही या ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून देत आहोत. संगणकीकरणासह इंटरनेट जोडणी या कार्यालयामध्ये असेल तसेच प्रभाग चार मधील आम्ही चारही नगरसेवक या कार्यालयामध्ये नागरिकांसाठी उपलब्ध असू. उद्या पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्यासह भाजप चे जेष्ठ पदाधिकारी तसेच मिरज सांगलीतील विविध मान्यवर व्यक्तींची उपस्थिती असणार आहे. महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटी ने प्रवास करावयाचा असेल तर शासनाने NCMC कार्ड बंधनकारक केले आहे, आज मालगाव रस्त्यावरील नागरिकांच्या सोयीसाठी श्री गजानन मंदिरामध्ये राज्य परिवहन महामंडळ आणि पद्मावती शांतीसेवा फौंडेशन तसेच नगरसेविका सौ अपर्णा विवेक शेटे यांच्या प्रयत्नातून स्मार्ट पेमेंट NCMC कार्ड काढण्यासाठी शिबिराचे आयोजन केले असून सायंकाळी ६ पर्यंत हे शिबीर आहे. जास्ती जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!