Advertisement

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द; आमदार जयंत पाटील यांना मोठा धक्का !


पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सांगली जिल्ह्यातील उरुण-ईश्वरपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी रद्द केले आहे. अतिक्रमण प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एका तक्रार अर्जावर कायदेशीर सुनावणी घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हा धडाकेबाज निर्णय दिला असून, यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.
काय आहे नेमके मुख्य प्रकरण आपण पाहूया
ईश्वरपूर येथील स्थानिक नागरिक जयकर दिनकर जाधव यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. आनंदराव मलगुंडे यांनी शासकीय/सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले असल्याचा आक्षेप या अर्जाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्र नगरपरिषद कायद्यातील तरतुदींनुसार, अतिक्रमण सिद्ध झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधी पदावर राहण्यास अपात्र ठरतो.
जिल्हाधिकाऱ्यांची सुनावणी: या प्रकरणावर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही बाजूंची सविस्तर सुनावणी झाली. सादर झालेले पुरावे आणि कायदेशीर बाबी पडताळून पाहत जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी मलगुंडे यांचे नगराध्यक्षपद रद्द करण्याचा अंतिम निर्णय दिला..
पुढे काय होणार?जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर आनंदराव मलगुंडे यांना कायदेशीर दिलासा मिळवण्यासाठी नगरविकास मंत्रालय (मंत्रालय, मुंबई) किंवा उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जर वरील न्यायालयातून या निर्णयाला स्थगिती मिळाली नाही, तर ईश्वरापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी आगामी काळात पुन्हा पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!