Advertisement

सांगली जिल्हा राज्य उत्पादन शुल्क चे अधीक्षक विश्वजित देशमुख यांनी स्वीकारला पदभार

प्रतिनिधी सुधीर गोखले

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक पदी नुकतीच नियुक्ती झालेले विश्वजित देशमुख यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला. अधीक्षक प्रदीप पोटे यांची जळगाव येथे बदली झाल्याने या जागी बीड येथे कार्यरत विश्वजित देशमुख यांनी सोमवारी आपला पदभार स्वीकारला उपाधीक्षक दीपक सुपे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी मिरज विभागाचे दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, लक्ष्मण पवार, जयसिंग खुंटावळे, स्वप्नील कांबळे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नूतन अधीक्षक विश्वजित देशमुख म्हणाले जिल्ह्यामध्ये यापूर्वी २०२० साली मी येथे कार्यरत असल्याने मला जिल्ह्याची चांगली माहिती आहे. यापुढे कोणत्याही प्रकारे अवैध मद्य निर्मिती विक्री वाहतूक हातभट्ट्या यावर निश्चितपणे कारवाई सुरु राहील. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर करू नये हलगर्जीपणा मी  खपवून घेतला जाणार नाही उपाधीक्षक दीपक सुपे यांनी आतापर्यंत चांगले काम केले आहे विशेषतः मिरज विभागाने चांगल्या प्रकारे अवैध मद्य विक्री किंवा वाहतुकीबाबत नियोजन पूर्वक काम केले आहे असेही त्यांनी यावेळी सांगतले. यावेळी त्यांना सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!