राज्य उत्पादन शुल्क चे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या निर्देशानुसार जिल्हा अधीक्षक प्रदीप पोटे यांच्यासह मिरज विभागाचे निरीक्षक तथा जिल्हा प्रभारी उपाधीक्षक दीपक सुपे यांच्या पथकाने सांगलीतील उत्तर शिवाजीनगर येथील एका राहत्या घरी छापेमारी करत बेकायदेशीर गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा हस्तगत केला या कारवाईत सुमारे ८३ हजारांची विविध कंपन्यांची विदेशी गोवा मेड दारू जप्त केली असून या प्रकरणामध्ये संशयित विशाल मारुती पवार(वय २८ रा उत्तर शिवाजीनगर) याला अटक करून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे हि कारवाई रविवारी पार पडली. उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी नुकतेच सांगली जिल्ह्यामधील सुरु असलेल्या बेकायदा हातभट्ट्या तसेच मद्य निर्मिती विक्री आणि वाहतूक तसेच गोवा मेड विदेशी मद्य याविरोधी कारवाई साठी अधीक्षक प्रदीप पोटे यांना आदेश दिले होते. त्या प्रमाणे अधीक्षक पोटे यांच्या सह उपाधीक्षक दीपक सुपे, मिरज चे दुय्यम निरीक्षक अजय लोंढे, जयसिंग घुटावळे, लक्ष्मण पोवार, जवान स्वप्नील आटपाडकर, विनायक खांडेकर, स्वप्नील कांबळे, श्रीमती शाहीन शेख, श्रीमती कविता सुपाने यांनी या कारवाईत भाग घेतला. यावेळी अधीक्षक प्रदीप पोटे आणि उपाधीक्षक दीपक सुपे यांनी नागरिकांना आवाहन केले कि, महापालिका क्षेत्रामधील तसेच सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही बेकायदा देशी विदेशी तसेच गोवा मेड मद्य विक्री त्याची वाहतूक अथवा निर्मिती याविरीधात जोरदार कारवाई सुरु केली आहे. नागरिकांना अशा प्रकारच्या अवैध मद्य विक्री बाबत माहिती मिळाल्यास त्यांनी मिरज सह सांगली येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला त्यांनी कल्पना द्यावी माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव उपट ठेवण्यात येईल.Website: http://satyarath.com/wp-admin
Leave a Reply