विटा येथे ४००० वृक्षारोपण अभियानास सेने अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते सुरुवात; आमदार सुहास बाबर यांची संकल्पना; ट्री-आर्मी आणि जेके फौंडेशन यांचे संयोजन
प्रतिनिधी सुधीर गोखले
खानापूर मतदार संघाचे आमदार सुहास बाबर म्हणजे सळसळते नवं चैतन्य आहे. य तरुण आमदाराला तुम्ही साथ दिली पाहिजे या तरुण आमदारांच्या विचारांना जपण्याची वाढवण्याची जबाबदारी आता तुम्हा सर्वांवर आहे’ असे गौरव उद्गार जेष्ठ सिने अभिनेते जग्गू दादा उर्फ जॅकी श्रॉफ यांनी विट्यातील गार्डी येथे काढले. आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून ट्री आर्मी हि संकल्पना सध्या आकारास येत आहे. या ट्री आर्मी च्या वतीने सुमारे ४००० वृक्ष लागवडीस सुरुवात झाली त्याचे उदघाटन जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाले. या वेळी बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले ‘समोरच्या माणसाने फुल दिले कि फुलंच मिळते दगड दिला कि दगड मिळतो. त्याप्रमाणे आपण दुसऱ्याने कितीही टीका केली तर शांत राहायचे आज या कार्यक्रमाला मी मुद्दाम उपस्थित राहिलो हे माझे भाग्य आहे. आमदार सुहास बाबर यांनी सुरु केलेली हि पर्यावरण संतुलनाची चळवळ एक दिवस मोठा आकार घेईल यात शंका नाही’ गार्डी येथील घानवड च्या माळावर ट्री आर्मी आणि जेके फौंडेशन ने या कार्यक्रमाचे आयोजन केले. या वृक्ष लागवड कार्यक्रमावेळी आमदार सुहास बाबर म्हणाले हि पर्यावरण संतुलनाची चळवळ इथेच थांबणार नाहीये आम्ही ७० ते ८० हजार झाडे लावण्याचा महासंकल्प केला आहे. मला जेव्हडे मताधिक्य मिळाले आहे त्याच संख्येने वृक्ष लागवड केली जाईल पुढील दोन वर्षांमध्ये हि लागवड होईल या उपक्रमामुळे विटा नगरीला जगभरात एक वेगळी ओळख मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या मराठी भाषेतील बोली ने आणि वागण्यातील साधेपणाने त्यांनी नागरिकांची मने जिंकली.
Leave a Reply