प्रतिनिधी सुधीर गोखले
पुण्यातील विषारी दारू प्रकारची गंभीर दखल घेतराज्य उत्पादन शुल्क चे कोल्हापूर विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी सांगली जिल्ह्यात अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या पथकासह ऑन फिल्ड कामगिरी करत लाखोंचा मुद्देमाल हस्तगत केला. काल दिवसभर उपायुक्त चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक पोटे यांनी प्रत्यक्ष जिल्ह्यातील मिरज जत कवठे महांकाळ विटा या शहरांसह अनेक ठिकाणी छापेमारी करत ११ गुन्हे दाखल केले यापैकी १ वारस गुन्हा तर २ बेवारस गुन्हे दाखल करण्यात आले. उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी अधीक्षक पोटे यांच्या पथकांसह निलजी बामणी धामणी येथे छापेमारी करून शेतातील हातभट्टी उध्वस्थ केली याबाबत उपायुक्त चिंचाळकर म्हणाले कि मी जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती वाहतूक आणि विकी प्रकरणी जिल्ह्याच्या बाहेरील पथकाची नियुक्ती केली आहे हे पथक गोपनीय रित्या काम करेल. सध्या अधीक्षक प्रदीप पोटे आणि उपाधीक्षक दीपक सुपे यांची कामगिरी समाधानकारक आहे. मात्र काही ठिकाणी उणीवा आहेत त्या मी भरून काढेन. सध्या उपाधीक्षक सुपे दुसऱ्या जिल्ह्याच्या मोहिमेवर असल्याने कारभार थोडा कासव गतीने सुरु आहे मात्र कारवाया आमच्या थांबलेल्या नाहीत.
Leave a Reply