सांगली मध्ये एक थरारक घटना घडली सांगली एल सी बी आणि कुपवाड पोलिसांनी केलेल्या सयुंक्त कामगिरीमध्ये अंदाजे तब्बल १३४ किलो गांजा पकडला ज्याची किंमत पकडलेल्या गाडीसह ४२ लाख ६३ हजार ५०० इतकी आहे. विना नंबर च्या कार मधून या गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित विकी विजय कांबळे (वय ३२, रा भीमनगर, पिंपरी रोड, जळोची ता बारामती) याच्या मुसक्या सांगली पोलिसांनी आवळल्या आहेत. याबाबत सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक संजीव झाडे यांना बुधवारी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बारामती मधून एक व्यक्ती पांढऱ्या रंगाच्या विना नंबर प्लेट कार मधून सांगली मध्ये गांजाची विक्री करण्यासाठी येणार आहे त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचला. बुधवारी साधारण सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेट कार माधवनगर कवलापूर मार्गे अहिल्यानगर कडे गेली या कार चा पाठलाग एल सी बीच्या पथकाने सुरु केला यादरम्यान कुपवाड पोलीस ठाण्याचे आनंदराव घाडगे हे अहिल्यानगर येथे गस्त घालत होते. अहिल्यानगर येथून पांढऱ्या रंगाची विना नंबर प्लेट कर संजयनगर कडे जात असताना त्यांना दिसली. या कार ने त्यांना चकवा दिला खरा मात्र एका पोलीस वाहनाला त्याने ठोकरले या वेळी आनंदराव घाडगे किरकोळ जखमी झाले. हि कार कुपवाड शहरातून एम आय डी सी कडे जात असताना पोलिसांनी या कार वर नियंत्रण मिळवले. आणि कर चालकाला ताब्यात घेतले. अधिक चौकशी करत असताना या कर चालकाने आपले नाव विकी कांबळे असे सांगितले. या चालकाने बारामती येथील चंदनसिंग नावाच्या इसमाच्या सांगण्यावरून चंदनसिंग याच्या पत्नीकडून गांजा खरेदीसाठी ४ लाख ३० हजार रु घेतले चंदनसिंग याची कार (एम एच ०२ सी झेड ०३०२) विकीने एकटेच चालवत ओडिसा राज्यातील संभलपूर जिल्ह्यातील बर्गट गावातून जॉकी याच्याकडून अंदाजे १३४ किलो गांजा खरेदी केला तर चंदनसिंग याच्या सांगण्यावरून सांगली जवळील हरिपूर येथील पप्पू फाकडे याला हा गांजा विक्री साठी आल्याची कबुली विकी कांबळे याने पोलिसांना दिली. या गांजा खरेदी विक्री प्रकरणी ओडिसा कनेक्शन उघड झाले आहे मात्र या सर्व प्रकरणात बडा मासा कोण याचा पोलीस शोध घेत आहेत.
Leave a Reply