प्रतिनिधी सुधीर गोखले
रुग्नांना रक्त किंवा इतर प्रकारच्या चाचण्यांचे रिपोर्ट हाताने लिहून देण्यात येत होते किंवा एक्स रे चे रिपोर्ट हे मोबाईल वर देता येत होते मात्र आता राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयामध्ये आधार नंबर वरून ओपीडी किंवा इतर प्रकारच्या चाचण्या ऑनलाईन होणार आहेत आणि हि यंत्रणा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर एकाच वेळी लागू करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे मात्र मिरजेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाने या बाबत आघाडी घेत हि यंत्रणा कार्यन्वित केली असून याबाबत या रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ रुपेश शिंदे म्हणाले आमच्याकडे या प्रणाली साठी कर्मचारी प्रशिक्षण घेत आहेत प्रशिक्षण पूर्ण होताच आम्ही हि यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत यामुळे केसपेपर च्या रांगा कमी प्रमाणात दिसतील रक्त आणि इतर चाचण्यांचे रिपोर्ट हे ऑनलाईन होतील त्यासाठी राग लावण्याची गरज राहणार नाही’ आधार कार्ड नंबर आधारित हि प्रणाली असल्याने रुग्णांचे आधार कार्ड मोबाईल नंबर शी जोडले गेलेले असावे. .
Leave a Reply