प्रतिनिधी सुधीर गोखले
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शालान्त परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षांचे निकाल लागले आणि शिक्षण क्षेत्रातील एक नावाजलेली शिक्षण संस्था म्हणजे ‘चाटे’ शिक्षण समूहाने आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे. ‘चाटे’च्या कोल्हापूर विभागातील (सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) तब्बल १९२३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्याहून अधिक गन मिळाले आहेत. यामध्ये समूहाच्या कोचिंग क्लासेस आणि स्कुल चे विद्यार्थी आहेत. याबाबत अधिक माहिती देताना शिक्षण समूहाचे संचालक प्रा डॉ भरत खराटे म्हणाले कि आमची दहावी निकालाबाबत गौरवशाली आणि वैभवशाली परंपरा आम्ही यंदाही कायम ठेवली आहे यामध्ये या यशाचे श्रेय कोल्हापूर विभागातील आमचे सर्व शिक्षक आणि विभाग प्रमुखांनी घेतलेल्या मेहनतीला जाते. आज आमच्या विद्यार्थिनी समृद्धी बोळाज स्नेहल टोम्पे आणि समृद्धी पवार या तिघींना १०० टक्के गुण मिळाले आहेत. नियोजन बद्ध वार्षिक शैक्षणिक आराखडा, वेळोवेळी पालकांनी केलेले सहकार्य आणि शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन यामुळे हे शक्य झाले आहे. आमच्या समूहातील गुणवंत विद्यार्थी स्वर्णश्री पाटील (९९टक्के) , रागिणी पांडे (९९.६०%), वरद येवले(९९.४०%), ओम जाधव(९९.४०%), अभिनंदन नवले (९९.२०%), मनस्वी हिवळे (९९.२०%), वैभवी गुंडप( ९९%), सोनाक्षी काकडे (९९%), आशुतोष फडणीस(९९%) आणि वर्षा सोंडकर (९९%) विभावरी मोहिते(९८.८०%), चिन्मय धनवडे(९८.८०%),वेदिका नागपूरकर(९८.८०%), शर्वरी गोरे(९८.६०%), राजवर्धन पोवार(९८.६०%), श्लोक शिर्के(९८.४०%), सोनम भोसले(९८.४०%), अवंतिका ताटे(९८.४०%), मृणाल पाटील(९८.२०%), कार्तिकी चिंचकर(९८.२०%), चाहत जमादार(९८%), निधी वाळकी(९८%) या सर्व यशवंत विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचे समूहाचे संचालक प्रा मच्छिन्द्र चाटे, प्रा गोपीचंद चाटे आणि प्रा डॉ भरत खराटे आणि मिरज विभागाचे प्रा सादिक मुजावर यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
Leave a Reply