Advertisement

मार्च एंडिंग .. बँका, पतसंस्था आणि वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचा थकबाकीदारांकडे ससेमिरा सुरु

संवाददाता सुधीर गोखले सांगली से 
मार्च महिना म्हणले कि वित्त पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांना आपल्या जुन्या थकबाकी दरांची लिस्ट आठवते  नियमित हप्ते भरणारे असोत व नसोत मार्च  एंडिंग च्या दरम्यान तर थकबाकीदार व्यक्ती किंवा संस्थांच्या पायऱ्या वसुली साठी झिजवाव्या लागतात.मात्र काही ठिकाणी अपवाद वगळला तर या मार्च एंडिंग च्या वित्तीय पतपुरवठा करणाऱ्या संस्थांनी अगदी पराचा कावळा केल्याचे निदर्शनास आले आहे. काही होतकरू तरुणांनी आपल्या व्यवसायासाठी काही नामवंत संस्थातून पतपुरवठा घेतलेला आहे. मात्र,  व्यवसायातील चढ उतारामुळे या वित्तीय संस्थांच्या कर्ज फेडी साठी हप्ते न फेडू शकणाऱ्या नवोदित किंवा जुन्या उद्योजकांची संख्या तुलनेत जास्त आहे. सध्या संपूर्ण जग हे युद्धाच्या सावटाखाली आहे. भविष्यात जगभरात काहीही होऊ शकते जागतिक बाजारपेठेत सध्या अस्थिर वातावरण आहे. याचा निश्चितच परिणाम विविध उद्योग धंद्यांवर होत आहे. मात्र वित्तीय पतपुरवठा करणाऱ्या संस्थांना याचे काही देणे घेणे नाही त्यांना मार्च एडिंग च्या वसुलीशी मतलब असते. मिरजमध्येही अशाच एका प्रकरणामध्ये एका सांगलीतील प्रसिद्ध वित्तपुरवठा करणाऱ्या पतसंस्थेने एका दुचाकी दुरुस्ती करणाऱ्या यवकाच्या मागे वसुलीचा तगादा लावला आहे. काही खाजगी आणि व्यावसायिक अस्थिर परिस्थिती मुळे या युवकास पतसंस्थेचे हप्ते भरणे कठीण जात आहे. मात्र त्याने एक ठराविक मुदत मागूनही या पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांनी आजतागायत वसुलीचा तगादा लावल्याचे समजते आता या तगाद्यापाई या तरुणाने कोणते अनुचित पाऊल जर उचलले तर कोण जबाबदार ठरेल हेही पहावे लागेल ?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!