लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीला भेट दिली.
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी पियूष गोंगले
लोकनेते शहिद विजयराव वाकोडे साहेब आणि कायद्याचा विद्यार्थी शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराची सांत्वनपर भेट घेतली. पण दौरा कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली त्या पुतळ्याला राहुल गांधी हे अभिवादन करू शकले नाही याची खंत आणि खेद वाटतो.
यात राहुल गांधींची तसूभरही चूक आहे असं मला वाटत नाही.
मी माजी राज्यमंत्री डॉ फौजिया खान मॅडम यांचा PA राहिलो आहे. दौरा ठरत असताना स्थानिक नेत्यांचे मत विचारात घ्यायचे असते आणि स्थानिक नेत्यांनी त्यांना brief करायचे असते.
पहिला दौरा कार्यक्रम flash झाला तेव्हा लोकनेते शहिद विजयराव वाकोडे साहेबांच्या निवासस्थानी भेटीचाही उल्लेख नव्हता. नंतर हा दौरा rectified करून त्यात समावेश करण्यात आला. खरं तर ही सुधारणा करत असताना त्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन आणि धरणे आंदोलकांशी संवाद याचा समावेश करायला हवा होता. पण असं झालं नाही. उगीच राहुल गांधी यांना दोष देण्यात अर्थ नाही…