Advertisement

वाळूचा एकही ट्रक गावातून जाऊ देणार नाही नसता पेटवण्यात येईल संतप्त ग्रामस्थांची आक्रमक भूमिका

वाळूचा एकही ट्रक गावातून जाऊ देणार नाही नसता पेटवण्यात येईल संतप्त ग्रामस्थांची आक्रमक भूमिका

प्रतिनिधी गणेश निंबाळकर वैजापूर

वाळू वाहतूक करणारा एकही ट्रक गावातून जाऊ देणार नाही नसता ट्रक पेटवण्यात येईल असा इशारा लाडगाव ग्रामस्थांनी दिला आहे काल अतिशय दुखत असे घटना घडली आपल्या अकरा वर्षाचा मुलगा त्यांनी जीव गमावल्यामुळे समस्त गावकरी खूप भावनिक झाले आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी ताबडतोब ग्रामसभा घेऊन काही ठराव या ठिकाणी मांडण्यात आले आहे
1 वाळू वाहतूक करण्यासाठी पर्यायी मार्ग निवडावा
2 गावात स्पीड बेकर टाकने
3 बस स्टँड समोर रिक्षा स्टॅन्ड ला वेगळी जागा देणे
3 गावात बाजार भरत असल्याकारणाने जे काही शेतकरी या बाजार करण्यासाठी आलेले व्यक्तींनी गाड्या लावण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करणे बाबत.
तहसीलदार उपजिल्हाधिकारी पोलीस स्टेशन येथे अतिक्रमण बाबत काढणे बाबत पत्र पाठवले एका विद्यार्थ्यांचा काल डंपर खाली चिरडून मृत्यूची झाल्याची घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहे जोपर्यंत चालकाला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ग्रामस्थांचा सवाल होता मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर आम्ही शंभर टक्के कारवाई करू अशी आश्वासन दिल्यानंतर रात्री अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले व सदरील गुन्ह्याची नोंद विरगाव पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!